चांदूर रेल्वेत १.६१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:59+5:30

तालुक्यातील तुळजापूर, टेंभुर्णी, दिलावरपूर, सालोरा, कारला, जिल्हा निधी, जनसुविधा, आमदार निधी, विशेष निधी अशा विविध योजनांतर्गत सिमेंट रस्ता, नाली, समाजमंदिर, प्रवासी निवारा, पुतळा सौंदर्यीकरण, पांदण रस्ता अशा एकूण १.६१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रयत्नांतून झाले आहे

Bhoomi Pujan for development work of 1.5 crore in Chandur Railway | चांदूर रेल्वेत १.६१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

चांदूर रेल्वेत १.६१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

Next
ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : मूलभूत सुविधांवर भर, सभागृह, प्रवासी निवाऱ्यांची मुहूर्तमेढ

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूररेल्वे : आमदार वीरेंद्र जगताप यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे. विरोधी पक्षाचे आमदार असतानाही त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी आग्रही असलेल्या आ. जगताप यांनी मंगळवारी तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. या विकासकामांना लवकरच सुरुवात होऊन गावे प्रगतिपथावर जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तालुक्यातील तुळजापूर, टेंभुर्णी, दिलावरपूर, सालोरा, कारला, जिल्हा निधी, जनसुविधा, आमदार निधी, विशेष निधी अशा विविध योजनांतर्गत सिमेंट रस्ता, नाली, समाजमंदिर, प्रवासी निवारा, पुतळा सौंदर्यीकरण, पांदण रस्ता अशा एकूण १.६१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रयत्नांतून झाले आहे. आमदार जगताप यांचा विकासकामांचा झपाटा सुरूच आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बंडू देशमुख, प्रदीप वाघ, रंजना गवई, जगदीश आरेकर, सचिन जाधव, साहेबराव शेळके, रावसाहेब शेळके, जीवन शेळके, विनायकराव शेळके, इंद्रपाल बनसोड, संजय ठवरे, राठोड, इंगोले, धानोरा म्हालीच्या सरपंच भारती नर्सेकर, मालखेडचे सरपंच अशोक रोडगे, सावंग्याचे सरपंच सोनाली चतुर, बासलापूरच्या सरपंच शांता गडलिंग, चिरोडीच्या अर्चना राठोड, मांजरखेडचे दिलीप गुल्हाने यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील समाजमंदिर, रस्ते, स्वच्छतागृह आदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्थानिकांनीच उचलली पाहिजे, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.
धानोरा म्हाली, दहिगाव धावडे, मालखेड, लालखेड, सावंगा विठोबा, नया सावंगा, चिरोडी, बासलापूर, मांजरखेड (कसबा) या गावांतील पूल, नाली, रस्ता सुधारणा, सभागृह बांधकाम, स्मशानभूमी रस्ता, अंबादेवी मंदिरात विद्युतीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण आदी कामांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे विकासाची मुहूर्तमेढ साधली जाणार आहे.

Web Title: Bhoomi Pujan for development work of 1.5 crore in Chandur Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.