बीएचआरने केली गुंतवणूकदाराची दोन लाखांनी फसवणूक
By Admin | Published: April 1, 2015 12:18 AM2015-04-01T00:18:59+5:302015-04-01T00:18:59+5:30
भाईचंद हिराचंद रायसोनी के्रडिट को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेट सोसायटीच्या खात्यामध्ये ठेवलेले पैसे परत न केल्याची तक्रार सोमवारी एका खातेदारांनी राजापेठ पोलीस ठाण्यात केली.
अमरावती : भाईचंद हिराचंद रायसोनी के्रडिट को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेट सोसायटीच्या खात्यामध्ये ठेवलेले पैसे परत न केल्याची तक्रार सोमवारी एका खातेदारांनी राजापेठ पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी संस्था संचालकसह अन्य कर्मचाऱ्यांविरुध्द पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार राधेश्याम झुंबनलाल चांडक (६७) यांनी राजापेठ परिसरातील बीएचआर के्रडिट सोसायटीच्या शाखेत दोन लाखांची रक्कम दोन वर्षांकरिता गुंतविली होती. मात्र, मुदत संपल्यावरही के्रडिट सोसायटीने राधेश्याम चांडक यांना व्याजासह पैसे परत केले नाही. त्यांनी बीएचआरच्या शाखेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, मात्र पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथील मुख्य शाखेशी सपर्क करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चांडक यांनी जळगाव कार्यालयाशी संपर्कसुध्दा केला. मात्र, त्यांनीसुध्दा पैसे परत करण्यासाठी टाळाटाळ केली. असा आरोप चांडक यांनी तक्रारीत केला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी व अन्य विरुध्द भादंविच्या कलम ४२०, ४०९, ४६८, ३४, १२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.डी. चव्हाण यांनी केला.