प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:39 PM2019-01-13T22:39:55+5:302019-01-13T22:40:44+5:30

निवारा ही मनुष्याची मुलभूत गरज आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबांना परवडणारी घरे बांधून देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी रविवारी केले.

Bhumi Pujan of the 60 crore project under Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Next
ठळक मुद्देम्हसला, बडनेऱ्याला प्रकल्प : ८६० घरकुलांची उभारणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निवारा ही मनुष्याची मुलभूत गरज आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबांना परवडणारी घरे बांधून देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी रविवारी केले.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत परवडणाºया घरांची योजना, मौजा म्हसला व बडनेरा येथील घरांच्या प्रकल्पांचे ६० कोटी रुपयाचे भुमिपूजन पालकमंत्र्यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार रवि राणा, महापौर संजय नरवणे, स्थायी समिती सभापती विवेक कलोती, पक्षनेता सुनील काळे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, बाळासाहेब भुयार, जिल्हाध्यक्ष जयंत डेहनकर, मनपा आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसदकर आदी उपस्थित होते.
प्र्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरात एकूण ८६० घरांचे बांधकाम घटक क्रमांक एक ते चार अंतर्गत करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत सदनिकेची अंदाजित किंमत नऊ लक्ष रुपये आहे. लाभार्थ्यांना शासनाचे अडीच लाखांचे अनुदान मिळेल. यासाठी लाभार्थ्यांना ४९ हजार रूपयाचा धनादेश अनामत रक्कम म्हणून जमा करावयाची आहे. उर्वरित सहा लक्ष रुपये हिस्सा बँकेसोबत समन्वय साधून गृहकर्ज स्वरुपात उपलब्ध केल्या जाईल. तीन प्रकल्पामध्ये एकूण ५५९२ लाभार्थी असून घरकुलांचे बांधकाम कार्य सुरु असल्याचे महापालिका आयुक्त संजय निपाने यांनी सांगीतले.

Web Title: Bhumi Pujan of the 60 crore project under Pradhan Mantri Awas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.