मेळघाटात भरली भूमका अन् पडियार बाबांची शाळा; आरोग्य विभागाचा उपक्रम 

By जितेंद्र दखने | Published: July 26, 2023 06:20 PM2023-07-26T18:20:51+5:302023-07-26T18:20:59+5:30

या कार्यशाळेत काटकुंभ व चुरणी परिसरातील ८० भूमकांनी हजेरी लावली होती.

Bhumka and Padiyar Baba's school filled in Melghat An initiative of the Department of Health | मेळघाटात भरली भूमका अन् पडियार बाबांची शाळा; आरोग्य विभागाचा उपक्रम 

मेळघाटात भरली भूमका अन् पडियार बाबांची शाळा; आरोग्य विभागाचा उपक्रम 

googlenewsNext

अमरावती: जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील आदिवासी विकास भवनात ही एकदिवसीय कार्यशाळा मंगळवारी पार पडली. या कार्यशाळेत काटकुंभ व चुरणी परिसरातील ८० भूमकांनी हजेरी लावली होती. मेळघाटातील आदिवासी बांधवांचा भूमका आणि पडियार बाबा यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांपासून आदिवासी बांधव दूर राहतात. आदिवासी बांधवानी भूमका व पडियार बाबा यांच्याकडे जाणाऱ्या आदिवासी बांधवांना महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले. तर लाभार्थी या विभागाच्या सेवा घेतील आणि मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होईल. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत चुर्णी येथे भूमका-पडियार बाबांची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. विशेष म्हणजे चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ आणि चुरणी या भागांत भूमका आणि पडियार बाबा यांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. या भागातील गावागावांत भूमका आणि पडियार बाबा दिसून येतात. येथील लोकांचा या बाबांवर असलेला प्रचंड विश्वास आणि त्यांची लोकांवर उपचार करण्याची पद्धत यांमुळे लोक आरोग्याच्या सोईसुविधांपासून दूर जातात. हा प्रकार टाळण्यासाठी आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागांची सेवांमध्ये सहभाग वाढविण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करावे. 

यावेळी सर्व भूमकांना स्वच्छता, आरोग्य आणि आहाराचे प्रशिक्षण देण्यात येऊन कुपोषित बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांनी शासकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले व त्यांचे स्तरावर कोणत्याही पद्धतीचा उपचार न करता वैद्यकीय उपचार घेण्यासाठीचा सल्ला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी सर्व भूमकांनी शासकीय सेवेमध्ये मदत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासित केले. यावेळी मार्गदर्शक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुभाष ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण परिसे यांसह प्राथामिक आरोग्य केंद्रांचे डॉ. माहूरकर मॅडम आणि डॉ. कंकाळ, आरोग्यसेविका व महिला बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Bhumka and Padiyar Baba's school filled in Melghat An initiative of the Department of Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.