दुकानासमोर उभी केलेली दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:02+5:302021-07-29T04:13:02+5:30
भरदुपारी घरफोडी, १.६० लाखांचा ऐवज लंपास अंजनगाव सुर्जी : घराला कुलूप लावून गेले असता, अज्ञाताने कडीकोंडा तोडून कपाटातील ५३ ...
भरदुपारी घरफोडी, १.६० लाखांचा ऐवज लंपास
अंजनगाव सुर्जी : घराला कुलूप लावून गेले असता, अज्ञाताने कडीकोंडा तोडून कपाटातील ५३ हजार रुपये रोख, १.७ लाखांचे दागिने असा एकूण १.६० लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना २७ जुलै रोजी घडली. राहुल रामेश्वर ठाकरे (३२, रा. देवगिरेनगर) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-----------------
अंजनगावातून २.८५ लाखांचा ऐवज लंपास
अंजनगाव सुर्जी : दुपारी घरी कुणी नसताना कडीकोंडा तोडून कपाटातील १४० ग्रॅम वजनाचे दागिन्यांसह ८५ हजार रुपये रोख असा २.८५ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आले. ही घटना २७ जुलै रोजी दुपारी १२.४५ वाजता दरम्यान बालाजी प्लॉट येथे घडली. वासुदेव साहेबराव जायले (५७) यांच्या तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------------
घरातून १९ हजारांची रोकड लंपास
पथ्रोट : कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दार तोडून डॉवरमधील १९ हजार रुपये लंपास केल्याची घटना गोंडवाघोली येथे १० दिवसापूर्वी घडली. महिलेच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी २७ जुलै रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------
शेतीच्या वादातून जीवे मारण्याची धकमी
खल्लार : शेतीचा वाद विकोपाला गेल्याने शेतकऱ्याला अन्य एका शेतकऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना लेहगाव येथे २७ जुलै रोजी घडली. पुरुषोत्तम यांच्या तक्रारीवरून खल्लार पोलिसांनी प्रीतम (५०) नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------------
युवकाला २९ हजारांनी गंडविले
नांदगाव खंडेश्वर : पैसे परत करण्याचे आमिष देऊन २५ वर्षीय सेक्युरिटी गार्डला ओटीपी मागवून २८९९६ रुपयांनी गंडविल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात उघड झाली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहे.
------------------
वसुलीला गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
नांदगाव खंडेश्वर : वसुलीला गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांचे वाहन अडवून शिवीगाळ करण्यात आली. कामात अडथळा आणल्याची घटना २७ जुलै रोजी सातरगाव येथे घडली. वीज अभियंता प्रसाद कुटेमाटे यांच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी आरोपी दामोदर वसंत भोयर (५०), अंकुश पुंडलिक गावंडे, संजय नागोवा मेश्राम (४५), प्रशांत काकडे (३५, रा. सातरगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------------------
ओव्हरलोड रेती वाहून नेणारा ट्रक जप्त
तिवसा : ओव्हरलोड रेती वाहून नेताना गस्तीदरम्यान तिवसा पोलिसांनी रेतीसह ट्रक ताब्यात घेतला. ही कारवाई पंचवटी चौकात २७ जुलै रोजी पहाटे ४ वाजता करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी एमएच २१ बीएच ९९३३ क्रमांकाचा ट्रकचालक सै. नईम सै. मोहम्मद (३३) व मालक लकी अली (रा. चोहट्टा बाजार परतवाडा)विरुद्ध गुन्हा नोंदवून ट्रक ताब्यात घेतला.
---------------
नऊ ब्रास रेतीसह ट्रक ताब्यात
तिवसा : ओव्हरलोड रेती वाहून नेताना पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी आढळून आले. कागदपत्रे तपासणी असताना अवैध रेती वाहून नेताना लक्षात आल्याने रेतीसह ट्रक ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई २७ जुलै रोजी पंचवटी चौकात करण्यात आली. तिवसा पोलिसांनी एमएच १८ एए १०५१ क्रमांकाच्या ट्रकसह ९ ब्रास रेती जप्त ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला.
------------
शेतातील गोठ्यातून लोखंडी पाईप लंपास
धामणगाव रेल्वे : मौैजा दत्तापूर शिवारातील गोठ्याचे कुलूप फोडून आतील २५ ते ३० लोखंडी पाईप लंपास केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघड झाली. अशोक जानकीराम टावरी (६३, रा. गांधी चौक) यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------------------
दुकान फोडले, २२ हजारांचा माल लंपास
चांदूर रेल्वे : दुकान फोडून आतील २२२०० रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना रेल्वे पुलाजनीक १२ ते १३ जुलै दरम्यान घडली. प्रभाकर गोविंदराव मेहेत्रे यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी २७ जुलै रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------
माहेरहून पैशासाठी विवाहितेचा छळ
शिरखेड : दुकान टाकण्याकरिता माहेरहून ३ लाख रुपये आणण्यासाठी लावत २३ वर्षीय विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार शिरखेड पोलिसांत देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी आरोपी प्रज्ज्वल भाऊराव पंचाळे, जयमाला वानखडे, प्रमोद पंचाळे (रा. शिरखेड), जय केशव ठाकरे, केशव ठाकरे विरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------------