उदखेड मार्गावर महाकाय अजगर
By admin | Published: December 4, 2015 12:22 AM2015-12-04T00:22:09+5:302015-12-04T00:22:09+5:30
पोहरा वनवर्तळअंतर्गत येणाऱ्या भानखेडा ते उदखेड मार्गावर गुरुवारी सकाळी महाकाय अजगर आडवा आल्याने मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.
पोहरा बंदी : पोहरा वनवर्तळअंतर्गत येणाऱ्या भानखेडा ते उदखेड मार्गावर गुरुवारी सकाळी महाकाय अजगर आडवा आल्याने मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.
अजगर निघाल्यामुळे उदखेड मार्गावर अजगर पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी जमली होती. जवळपास १० फुटांच्या वर लांबी असलेल्या अजगराने कुठला तरी लहान प्राणी गिळला होता. त्यामुळे त्याला मार्गावरून सरपटणे कठीण झाले होते. अजगर निघाल्याची माहिती मिळताच पोहऱ्याचे वनपाल विनोद कोहळे, वनरक्षक मनोज ठाकूर, अरुण महाजन, एन.जी. नेतनवार, राजेश खडसे, किशोर छोटे, बाबाराव पळसकर, दीपक नेवारे आदी वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठूून सदर महाकाय अजगराला रेस्क्यू करून उद्खेड बीटच्या वनखंड क्र. १५४ या जंगलात सोडून दिले. अजगराला कुणी ही इजा पोहचवू नये याकरिता बीट वनरक्षक महाजन तेथे वनमजदूरासह तैनात होते. यापूर्वी चिरोडी भागात अजगर मृत अवस्थेत आढळून आला होता. (वार्ताहर)