चिरोडी जंगलात आढळला बिबट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:35 PM2019-03-24T22:35:47+5:302019-03-24T22:36:06+5:30
चांदूररेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत चिरोडी वनवर्तुळातील वरुडा जंगलात रविवारी बिबट्याने दर्शन दिले. वनविभागाचा कंत्राटी कर्मचारी जंगलात फिरत असताना दुपारी २ वाजता हा बिबट दृष्टीस पडला. त्याने धाडसाने त्याला कॅमेराबद्ध केले. या जंगलात सन २०१६ मध्ये १६ बिबट्यांची नोंद झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : चांदूररेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत चिरोडी वनवर्तुळातील वरुडा जंगलात रविवारी बिबट्याने दर्शन दिले. वनविभागाचा कंत्राटी कर्मचारी जंगलात फिरत असताना दुपारी २ वाजता हा बिबट दृष्टीस पडला. त्याने धाडसाने त्याला कॅमेराबद्ध केले. या जंगलात सन २०१६ मध्ये १६ बिबट्यांची नोंद झाली आहे.
शहरालगत वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र तब्बल २१ हजार ४८५ हेक्टर क्षेत्राने व्यापलेले आहे. या विस्तिर्ण जंगलात औषधीयुक्त वनसंपदेसोबत बिबट, मोर आणि निलगाई मुक्त विहार करतात. मात्र बिबटांचे दर्शन फारसे होत नाही. दरम्यान रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कंत्राटी कर्मचारी अनिल गुप्ता यांना वरुडा जंगलात सुमारे ७०० मिटर अंतरावर बिबट दिसला. त्यांनी त्याची दोन छायाचित्रे काढली. काही वेळानंतर तो बिबट तेथून निघून गेला. तूर्तास जंगलातील पाणवठे कोरडी पडली असून त्यात रोज पाईपलाईनद्वारे पाणी सोडले जाते. त्यामुळे तो बिबट कृत्रिम पाणवठ्यावर तृष्णा भागविण्यास आला असावा, अशी शक्यता आहे.
वरुडा जंगलाच्या रस्त्याने जात असताना मला अचानक जंगलाच्या आत काही अंतरावर बिबट दिसला. त्याने जंगलात धूम ठोकली. मात्र तेवढ्या कालावधीत त्याला मोबाईलमध्ये टिपले.
अनिल गुप्ता, कंत्राटी कर्मचारी