‘बिहार पॅटर्न’ने सजणार हिरवळयुक्त रस्ते
By admin | Published: June 8, 2014 11:33 PM2014-06-08T23:33:19+5:302014-06-08T23:33:19+5:30
रोजगार हमी योजनेतून रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात बिहार पॅटर्न राबविण्यात येत आहे. यंदाही सामाजिक वनिकरणच्या माध्यमातून ८५ गावांमध्ये हा पॅटर्न राबविण्यात
जितेंद्र दखने - अमरावती
रोजगार हमी योजनेतून रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात बिहार पॅटर्न राबविण्यात येत आहे. यंदाही सामाजिक वनिकरणच्या माध्यमातून ८५ गावांमध्ये हा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा सुमारे १ लाख ८५0 झाडे लावण्यात येणार ,आहेत. २00 झांडाच्या तीन वर्षांच्या संवर्धनासाठी चार कुटुंबीयांची निवड करून त्याच्यावर संरक्षण आणि संगोपनाची जबाबदारी दिली जाते .
सामाजिक वनिकरणाच्या माध्यमातून रस्त्यावर दुतर्फा झाडे लावली जातात. परंतु संरक्षण आणि संगोपनाअभावी ती जळून जात होती. या झाडांचे संवर्धन होण्यासाठी राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी वृक्षसंवर्धनाचा बिहार पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून बिहार पॅटर्न राबविण्यात येत आहे.