दुचाकीची दाम्पत्याला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:12 AM2021-07-30T04:12:27+5:302021-07-30T04:12:27+5:30

मद्यपिने हनुवटीला घेतला चावा परतवाडा : शेजारी राहणाऱ्या मामेभावाने क्षुल्लक कारणावरून वाद करून मुलीला मारहाण करून फिर्यादीच्या हनुवटीला चावा ...

The bike hit the couple | दुचाकीची दाम्पत्याला धडक

दुचाकीची दाम्पत्याला धडक

Next

मद्यपिने हनुवटीला घेतला चावा

परतवाडा : शेजारी राहणाऱ्या मामेभावाने क्षुल्लक कारणावरून वाद करून मुलीला मारहाण करून फिर्यादीच्या हनुवटीला चावा घेतल्याची घटना कविठा येथे २७ जुलै रोजी घडली. रामचंद्र डाहे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी संदीप सुरेश बोरवारविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

साखरपुड्यानंतर लग्नाला नकार

परतवाडा : साखरपुडा झाल्यानंतर घरी येऊन शिवीगाळ लग्न करू देणार नाही, अशी धमकी दिल्याची घटना खटकाली येथे २७ जुलै रोजी घडली. युवतीच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी संदीप झापू जामूनकर, आषारानी राजेश दहिकर, राजेश दहीकरविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------

केवायसी अपडेटच्या नावावर ३० हजारांनी गंडविले

परतवाडा : अनोळखी व्यक्तीने केवायसी अपडेट करण्यासाठी १० रुपये भरण्याचे सांगून खात्यातील २९८९८ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना २७ जुलै रोजी शांतीनिकेतन कॉलनीत घडली. तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी ८६३७५९५२६४ या मोबाईल सिमधारकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------

ऑनलाईन मैत्री करून मुलीला पळविले

कुऱ्हा : अल्पवयीन मुलीशी ऑनलाईन ओळखी करून पळवून नेल्याची घटना कुऱ्हा पोलीस ठाण्यांतर्गत २७ जुलै रोजी उघडकीस आली. वडिलाच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी आरोपी विजय पाटील (२५, रा. बीड) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------

कॅशबॅकच्या नावावर २ लाखांनी फसवणूक

कुऱ्हा : फोन-पेवर हजार रुपयांचे कॅशबॅक लागले आहे. त्यासाठी लिंक पाठविण्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने २.१ लाख ५९१ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना २१ जुलै रोजी अशोकनगरात घडली. युवतीच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी मोबाईल क्र. ९७४९९२७४८७ या सिमधारकाविरुद्ध २८ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.

----------------

आत्महत्येची धमकी देऊन महिलेवर अतिप्रसंग

तळेगाव दशासर : विवाहित महिलेवर जबरदस्तीने वारंवार अतिप्रसंग केल्याची घटना तळेगाव दशासर पोलीस ठाण्यांतर्गत उघड झाली. कुणाला सांगितल्यास मुलाला व नवऱ्याला मारून टाकेन, मी आत्महत्या करेन, अशा धमक्या दिल्याने ती सतत अत्याचार सहन करीत होती. पतीजवळ आपबिती कथन केल्यानंतर संमतीने पोलिसात तक्रार देण्यात आली. यावर पोलिसांनी आरोपी मनोज चंद्रभान गुजर (रा. येरड बाजार) विरुद्ध २८ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.

-------------------

विवाहितेला कीटकनाशक पाजण्याचा प्रयत्न

मंगरुळ दस्तगीर : माहेरहून पैसे आणण्यासाठी व चारित्र्यावर संशय घेऊन २४ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून दुखापत पोहचविण्याच्या उद्देशाने कीटकनाशक पाजण्याचा प्रयत्न केल्याची घटना निंबोरा बोडखा येथे घडली. विवाहितेच्या तक्रारीवरून मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी आरोपी योगेश देविदास चवरे, दिनेश चवरे, शिल्पा चवरे, देवीदास चवरे, जिजाबाई चवरे (रा. निंबोरा बोडखा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

शेताच्या धुऱ्यावरून दुचाकी लंपास

शेंदूरजना घाट : शेताच्या धुऱ्यावर उभी केलेली १० हजार रुपयांची दुचाकी क्रमांक एमएच २७ टी ५५४५ ही अज्ञाताने लंपास केल्याची घटना २७ जुलै रोजी घडली. हकीम खान हुसेन खान पठाण यांच्या तक्रारीवरून शेंदूरजना घाट पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-----------------

पानटपरीत धारदार शस्त्र बाळगल्याने गुन्हा

अमरावती : कुणालाही दुखापत करण्याच्या उद्देशाने पानटपरीत धारदार चाकू बाळगल्याचे पोलिसांना आढळून आले. महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी आकाश मधुकर खडसे (३१, रा. भाग्योदय कॉलनी) विरुद्ध २७ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.

----------------

राजापेठ हद्दीत महिलेचा विनयभंग

अमरावती : बँकेत नोकरी करीत असलेल्या महिलेशी संवाद साधून ओळख निर्माण केल्यानंतर तिच्याशी बोलण्याकरिता रस्त्यात अडविल्याची घटना २७ जुलै रोजी एकनाथपुरम भागात घडली. महिलेच्या तक्रावरून राजापेठ पोलिसांनी रोशन देविदास मारोडकर (३१, संताजीनगर) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला.

---------------------

टॉवरवरील बॅटरी लंपास

भातकुली : मोबाईल टॉवरवरील जुन्या बॅटरी लंपास केल्याची घटना २७ जुलै रोजी सायत येथे ठाकरे यांच्या शेतात उघडकीस आली. तक्रारीवरून भातकुली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: The bike hit the couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.