दुचाकी धडकल्या, अल्पवयीनांचा भररस्त्यात राडा; रॉडने मारहाण, तिघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:28 PM2023-01-17T15:28:48+5:302023-01-17T15:30:53+5:30

अंजनगाव सुर्जी शहरात अपघातानंतर तणाव

Bikes collide, minors screamed on road; two minor beaten with a rod, three detained | दुचाकी धडकल्या, अल्पवयीनांचा भररस्त्यात राडा; रॉडने मारहाण, तिघे ताब्यात

दुचाकी धडकल्या, अल्पवयीनांचा भररस्त्यात राडा; रॉडने मारहाण, तिघे ताब्यात

Next

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : कॉलेजमध्ये जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यानंतर उडालेल्या वादाची ठिणगी पेटली. विशिष्ट समुदायाच्या सात ते आठ अल्पवयीन युवकांनी या अल्पवयीन विद्यार्थ्यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. ही घटना शहरात लेंधे मार्केटसमोरील रस्त्यावर १६ जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिस सूत्रांनुसार, विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्तिक राजेश दुर्गे (१६, रा. पानअटाई) आणि त्याचा मित्र वासुदेव रघुनाथ टिपरे (रा. सुर्जी) हे दोघे दुचाकीने महाविद्यालयाला निघाले होते. समोरून तिघांना घेऊन येणाऱ्या बुलेटच्या धडकेत हे दोघे मित्र रस्त्यावर कोसळले. एका हॉटेलसमोर कार्तिक व वासुदेवने त्यांना गाठले आणि आम्ही खाली पडलो तरी तुम्ही का थांबले नाही, अशी विचारणा केली. त्यावर धडक देणारा दुचाकीस्वार, रूक यहा पे, अभी तेरे को बताता, मेरे दोस्तो को बुलाता और तुमको बताता, असे म्हणाला. त्याने ५ ते ६ जणांच्या टोळक्याला घटनास्थळी आणले. बाजूच्या दुकानातील लोखंडी रॉड घेऊन कार्तिक व राजेश यांना त्यांनी जबर मारहाण केली. याशिवाय शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार अंजनगाव सुर्जी ठाण्यात कार्तिकने दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या टोळक्यातील तिघांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिस त्वरित पोहोचल्याने मोठी आपत्ती टळली.

दरम्यान, अंजनगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अंजनगाव पोलिस ठाण्यासमोर मोठा जनसमुदाय पोलिसांवर दबाव आणत होता. पोलिसांनी त्यांना हाकलून लावले. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सत्येंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दीपक वानखडे पुढील तपास करीत आहेत.

यापूर्वीही घडला होता अपघात

अटकेतील अल्पवयीन युवकाच्या दुचाकीने यापूर्वीही एक अपघात डीपी रोडवर झाला होता. यात एका व्यक्तीला पाय गमवावा लागला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला तरी आरोपी अल्पवयीन असल्याने समज देऊन सोडण्यात आले होते.

Web Title: Bikes collide, minors screamed on road; two minor beaten with a rod, three detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.