मेळघाटात बायोमेट्रिक, अचलपुरात सोनोग्राफी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:19 PM2019-06-03T23:19:16+5:302019-06-03T23:19:29+5:30

कुपोषणाचा डाग भाळी मिरविणारी मेळघाटातील आरोग्य यंत्रणाच आजारी असल्याचे चित्र नवे नाही. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक आदिवासी उपचाराविना दगावतात, असे निरीक्षण सरकारदरबारी नोंदविले गेले. त्यावर उपाय म्हणून त्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरीच्या नोंदीसाठी बायोमेट्रिक यंत्रे देण्यात आली. मात्र, अवघ्या काही महिन्यात दवाखान्यांतील ही यंत्रे बंद पडली. याशिवाय अचलपूर उपजिल्हा रूग्णालयातील सोनोग्राफी मशीन सात महिन्यांपासून बंद आहे.

Bio-metric in Akkalpur, Sonography stopped in Melghat | मेळघाटात बायोमेट्रिक, अचलपुरात सोनोग्राफी बंद

मेळघाटात बायोमेट्रिक, अचलपुरात सोनोग्राफी बंद

Next
ठळक मुद्देआरोग्याचा बट्याबोळ : अ‍ॅप्रन घालण्याच्या आदेशाला तिलांजली

परतवाडा : कुपोषणाचा डाग भाळी मिरविणारी मेळघाटातील आरोग्य यंत्रणाच आजारी असल्याचे चित्र नवे नाही. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक आदिवासी उपचाराविना दगावतात, असे निरीक्षण सरकारदरबारी नोंदविले गेले. त्यावर उपाय म्हणून त्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरीच्या नोंदीसाठी बायोमेट्रिक यंत्रे देण्यात आली. मात्र, अवघ्या काही महिन्यात दवाखान्यांतील ही यंत्रे बंद पडली. याशिवाय अचलपूर उपजिल्हा रूग्णालयातील सोनोग्राफी मशीन सात महिन्यांपासून बंद आहे.
आरोग्य सेवा संचालनालयाने १ जूनच्या आदेशान्वये आरोग्य कर्मचाºयांना युनिफॉर्म व डॉक्टरांना अ‍ॅप्रनची सक्ती केली आहे. प्राथमिक आरोग्य केंदे्र, उपकेंदे्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी त्यांच्यासाठी निर्देशित असलेला गणवेश (युनिफॉर्म) परिधान करावा. वैद्यकीय अधिकाºयांनी कामावर अ‍ॅप्रन बाळगणे बंधनकारक असल्याचे निर्देश त्यात दिले आहेत. तथापि, मेळघाटमध्ये कार्यरत शासकीय सेवेतील डॉक्टर कामावर असताना अ‍ॅप्रन घालत नाहीत.
मेळघाटात बोगस, झोलाछाप डॉक्टरची संख्या अधिक असल्याची ओरड स्वयंसेवी संस्थांकडून केली जाते. राज्य शासनाच्या १ जून रोजीच्या सक्त आदेशान्वये मेळघाटात कार्यरत डॉक्टर अ‍ॅप्रन घालतात की नाही, याकडे मेळघाटवासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

आॅनलाईन हजेरीस ठेंगा
प्राथमिक आरोग्य केंद्रासह सरकारी दवाखान्यांत बायोमेट्रिक हजेरी ठेवण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर कार्यरत आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाºयांच्या वेतनाकरिता १ जूनच्या आदेशान्वये बायोमेट्रिक हजेरीपट आवश्यक केला आहे. सर्व अधिकारी व कर्मचाºयांचे वेतन त्यानुसार करण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालनालयाने दिले आहेत. मेळघाटात अनेक ठिकाणी लावलेल्या या मशीन बंद असल्याने हजेरीपटावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सोनोग्राफी मशीन
सात महिन्यांपूर्वी अचलपूर उपजिल्हा रूग्णालयात आरोग्य विभागाने सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून दिली. पण, ही मशीन उपजिल्हा रुग्णालयात आणली तशीच पडून आहे. ती कुणीही आॅपरेट करून बघितली नाही. प्रशिक्षित तंत्रज्ञ नसल्याची ओरड आहे. बंद असलेली ही मशीन दहा दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाºयांनी यापूर्वी दोन वेळा दिले असले तरी आजही ती बंदच आहे.

असे आहेत आदेश
आरोग्य सेवा संचालनालयाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व दवाखाने यांचा आंतरबाह्य परिसर स्वच्छ, नीटनेटका ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आंतररुग्ण विभाग, प्रसूती कक्ष व स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यास सूचविले आहे. मेळघाटात यावर्षी ४०९ बालमृत्यू, १९७ उपजात मृत्यू व १४ मातामृत्यू आहेत. या परिसरातील आरोग्यविषयक समस्या आणि प्रश्न आजही कायम आहेत.

Web Title: Bio-metric in Akkalpur, Sonography stopped in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.