श्री दादासाहेब गवई विद्यालयात बिरसा मुंडा पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:24+5:302021-06-16T04:17:24+5:30
बिरसा मुंडा चे जीवन संघर्ष वीरता व पराक्रमाचे प्रतिक _ मधुकर अभ्यंकर अमरावती : आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या ...
बिरसा मुंडा चे जीवन संघर्ष वीरता व पराक्रमाचे प्रतिक _ मधुकर अभ्यंकर
अमरावती : आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या संघर्ष, वीरता व पराक्रमामुळे आदिवासी समाजाने त्यांचा देव म्हणून स्वीकार केला. अशा या पराक्रमाची आजच्या पिढीमध्ये गरज असल्याचे मत राहुल व्यायाम प्रसारक मंडळ अमरावतीचे अध्यक्ष मधुकर अभ्यंकर यांनी केले.
धारणी तालुक्यातील रत्नापूर येथील श्री दादासाहेब गवई विद्यालय व कर्मवीर दादासाहेब गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख संत गाडगेबाबा पतसंस्था परतवाडाचे अध्यक्ष प्रा. उद्धव कोकाटे, विवेक अभ्यंकर, प्रा. वर्षा वाटाणे, राजू हरणे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता वृक्षरोपण करून झाली. कार्यक्रमाचे संचालन रमेश कौतिककर, प्रास्ताविक प्रा. दिनेश मोहोड तर आभार दिनेश थोरात यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता माधव कानबाले, विनोद इंगळे, नरेंद्र तरवले, अमोल वानखडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रा. चंद्रशेखर काळे, मुकुद दांडगे, चेतन गोळे, चंद्रकांत पांडे, कु. सीमा खांडे, प्रमोद शेवाने, राहुल पांडे, रामेश्वर इंगळे, हिरालाल कुऱ्हाडे, लालचेन पटोरकर उपस्थित होते.
===Photopath===
150621\img-20210612-wa0029.jpg
===Caption===
श्री.दादासाहेब गवई विद्यालयात बिरसा मुंडा पुण्यतिथी साजरी