संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:40 PM2018-12-14T22:40:44+5:302018-12-14T22:41:00+5:30
खापरातून अंधाराच्या घरी सूर्य वाटणारे, स्वच्छतेचे महान पुजारी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांच्या ६२ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन बाबांच्या समाधीस्थळी १४ ते २१ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खापरातून अंधाराच्या घरी सूर्य वाटणारे, स्वच्छतेचे महान पुजारी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांच्या ६२ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन बाबांच्या समाधीस्थळी १४ ते २१ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे.
या महोत्सवात आठवडाभर विविध कार्यक्रम, व्याख्यानमाला, पुरस्कार वितरणासह प्रबोधनकार मंडळीची मांदियाळी राहणार आहे. महोत्सवातील श्रीमद् भागवत कथेचे पठण देवी वैभवश्रीजी यांच्या वाणीतून होणार आहे. बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
शहरातील श्री संत गाडगेबाबंच्या समाधीस्थळी पुण्यतिथी महोत्सवाचा प्रांरभ १४ डिसेंबरला होईल. सकाळी ९.३० वाजता महापौर संजय नरवने यांच्या हस्ते बाबांच्या समाधीचे पूजन व पुण्यातिथी महोत्सवाचे शुभारंभ, होईल. सप्ताहभर सकाळी १०.३० ते १२.३० व दुपारी २ ते ४ श्रीमद् भागवत कथा, १२.३० ते १ वाजेपर्यंत अंध अंपगांना अन्नदान, वस्त्रदान रात्री ८ ते ८.३० निकिता पुरी यांचे गीत रामायाण, रात्री ९ वाजता हभप नारायण महाराज पडोळे यांचे राष्ट्रीय कीर्तन, १५ डिसेंबरला रात्री ९ वाजता दीपक भांडेकर यांचे सप्तखंजेरी प्रबोधन, १६ डिसेंबरला रात्री ८ ते ९ बालकीर्तनकार जान्हवी घुमे (नागपूर) यांचे राष्ट्रीय कीर्तन, रात्री ९ वाजता युवा समाजप्रबोधनकार आकाश महाराज टाले नागपूर यांचे सप्तखंजेरी प्रबोधन, १७ डिसेंबरला रात्री ८ ते ८.३० ऐश्वर्या खंडारे यांचे कीर्तन, रात्री ९ ते १०.३० सप्तखंजेरीवादक इंजि.पवन महाराज दवंडे यांचा समाजप्रबोधन कार्यक्रम, १८ डिसेंबरला रात्री ८ ते ८.३० डॉ.पोर्णिमा दिवसे यांचे भक्तीरंग, रात्री ८.३० ते १०.३० उद्धवराव गाडेकर महाराजांचे राष्ट्रीय कीर्तन होईल.
समारोपीय २१ डिसेंबरला सकाळी पालखी मिरवणूक व दु.१२ वाजता तुळशीदास महाराज धर्माळकर यांचे काल्याचे कीर्तन. नंतर महाप्रसाद वितरण होईल, असे व्यवस्थापक प्रकाश महात्मे, गजानन देशमुख, मंगेश वानखडे यांनी कळविले आहे.