अतिदुर्गम हतरू आरोग्य केंद्रात जुळ्या मुलींचा जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:14+5:302021-06-11T04:10:14+5:30
मेळघाटातील आदिवासी डॉक्टरची रुग्णसेवा चिखलदरा : मेळघाटातील अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुंतागुंतीची प्रसूती यशस्वी झाली. शनिवारी ...
मेळघाटातील आदिवासी डॉक्टरची रुग्णसेवा
चिखलदरा : मेळघाटातील अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुंतागुंतीची प्रसूती यशस्वी झाली. शनिवारी एका मातेने दोन जुळ्या मुलींना सुखरूप जन्म दिला.
मेळघाटातील सर्वाधिक अतिदुर्गम भाग म्हणून हतरूचा समावेश आहे. तालुका मुख्यालयापासून ७०, तर अमरावती शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेश सीमेवर आहे. वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा या भागातील आदिवासींना स्वातंत्र्यानंतर आजही मिळणे दुरापास्त आहे. अलीकडच्या काळात येथे वीजपुरवठा सुरळीत असून, रस्त्याचे काम झाल्याने परिसरात सुधारणा झाली आहे चिखलदरा तालुक्यातील काजल येथील रहिवासी असलेले आदिवासी समाजाचे डॉक्टर संजय पंधराम कार्यरत असून आरोग्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी गुंतागुंतीची असलेली प्रसूती यशस्वीरीत्या केली सिमोरी येथील समाई सुनील बेठेकर या मातेच्या उदरात जुळी मुले असल्याचे लक्षात येताच वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पंधराम यांनी प्रसूतीगृहाच्या स्टाफला आवश्यक सूचना दिल्या व ही प्रसूती यशस्वीपणे पार पडली. औषधी निर्माण अधिकारी अनमोल शहा, आरोग्य सहायिका अलका गावंडे, विठ्ठलराव गावंडे, अलका देशमुख, अस्मिता आठवले, किरण इंगळे, दीपिका आठवले, आशिष मुंडे, परिचय कोरडे आदी केंद्रात कार्यरत आहेत.