बबनराव लोणीकर यांचे पोस्टर जाळले, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 06:58 PM2020-02-02T18:58:24+5:302020-02-02T19:03:01+5:30

बबनराव लोणीकर यांनी महिला शेतकरी व तहसीलदारांचा अपमान केल्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी लोणीकर यांचे पोस्टर जाळले

bjp Babanrao Lonikar poster burned in amravati | बबनराव लोणीकर यांचे पोस्टर जाळले, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संतप्त

बबनराव लोणीकर यांचे पोस्टर जाळले, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संतप्त

Next

परतवाडा (अमरावती) -  भाजपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिला शेतकरी व तहसीलदारांचा अपमान केल्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्थानिक जयस्तंभ चौक येथे लोणीकर यांचे पोस्टर जाळले. राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन दुपारी तीन वाजता करण्यात आले.

जालना जिल्ह्यात शेतकरी मेळाव्याला संबोधित करताला बबनराव लोणीकर यांनी महिला शेतकरी व तेथे उपस्थित महिला तहसीलदारांबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांचा आक्षेपार्ह विधाने करण्याचा खाक्या आहे. मात्र, राष्ट्रवादी हे सहन करणार नाही. स्त्रीशक्तीचा अपमान करणारे बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षकांकरिता देण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून करण्यात आला.

बबनराव लोणीकर यांनी माफीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी या आंदोलनादरम्यान दिला. तालुकाध्यक्ष सुषमा थोरात, शहराध्यक्ष संध्या इंगळे, स्मिता लहाने, अचलपूर विधानसभा अध्यक्ष संगीता जवंजाळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Ind Vs NZ : अखेरच्या सामन्यातही भारताचा न्यूझीलंडवर विजय; मालिकेत ५-० असे निर्भेळ यश

China Coronavirus : कोरोनामुळे जगभरात घबराट; चीनबाहेर एकाचा मृत्यू 

पदवीधारकांसाठी 5 हजार, पदव्युत्तरांसाठी 7500 रुपये बेरोजगारी भत्ता; काँग्रेसची घोषणा

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; दोन जवानांसह 4 जण जखमी

'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Web Title: bjp Babanrao Lonikar poster burned in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.