सभापतीपदांवर भाजपची मोहोर

By admin | Published: May 9, 2017 12:03 AM2017-05-09T00:03:28+5:302017-05-09T00:03:28+5:30

अपेक्षेप्रमाणे चारही विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदावर भाजपने मोहोर उमटविली.

BJP blasts on chairmanship | सभापतीपदांवर भाजपची मोहोर

सभापतीपदांवर भाजपची मोहोर

Next

आठ सदस्य अविरोध : ढोके,रासने,गावंडे,साहू सभापती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपेक्षेप्रमाणे चारही विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदावर भाजपने मोहोर उमटविली. सभापती-उपसभापतीपदासाठी प्रत्येकी एक नामांकन आल्याने भाजपच्या आठ सदस्यांच्या नावावर अविरोध शिक्कामोर्तब झाले. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सुदामकाका देशमुख सभागृहात ही अविरोध निवड प्रक्रिया पार पडली.
विधी समिती सभापतीपदी सुमती ढोके तर उपसभापतीपदावर संजय वानरे विराजमान झालेत. शहर सुधार समितीचे सुकाणू ज्येष्ठ नगरसेवक शिरिष रासने यांच्याकडे तर नूतन भुजाडे यांच्याकडे उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली.
शिक्षण समिती सभापती म्हणून चेतन गावंडे तर उपसभापती म्हणून पद्मजा कौंडण्य यांची अविरोध निवड झाली. तब्बल चौथ्यांदा सभागृहात पोहोचलेल्या कुसूम साहू यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी तर पहिल्यांदा सभागृहात पोहोचलेल्या संगीता बुरंगे यांची उपसभापतीपदी निवड झाली. विधी, शहर सुधार, महिला बालकल्याण व शिक्षण याचारही विषय समित्यांमध्ये भाजपचे प्रत्येकी ५ सदस्य आहेत. त्यामुळे सभापती-उपसभापतीपदाची अविरोध निवड अपेक्षित होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आठही नावांची औपचारिक घोषणा केली.

सत्ताधिशांकडून अभिनंदन
महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, सभागृह नेते सुनील काळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त सभापती-उपसभापतींचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. शहरासाठी विकासाभिमुख दृष्टीकोन ठेऊन आपण कार्यरत राहू, असा आशावाद नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Web Title: BJP blasts on chairmanship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.