भाजपने राजापेठ ठाण्यासमोर जाळला ‘सीएम’चा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:17 AM2021-08-25T04:17:25+5:302021-08-25T04:17:25+5:30

फोटो पी बीजेपी २४ अमरावती : युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्यालयासमोरील फलकाच्या जाळपोळीचे प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी भाजपने राजापेठ ...

BJP burnt CM's statue in front of Rajapeth police station | भाजपने राजापेठ ठाण्यासमोर जाळला ‘सीएम’चा पुतळा

भाजपने राजापेठ ठाण्यासमोर जाळला ‘सीएम’चा पुतळा

Next

फोटो पी बीजेपी २४

अमरावती : युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्यालयासमोरील फलकाच्या जाळपोळीचे प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी भाजपने राजापेठ पोलीस ठाण्यासमोरील चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. राजकमल चौकात शहर कोतवाली व राजापेठ बसस्थानक चौकात राजापेठ पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ती संधी हेरून भाजयुमोचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रणीत सोनी व अन्य कार्यकत्यांनी पोलीस ठाण्यासमोर प्रतीकात्मक दहन करून मुख्यमंत्र्याविरोधात प्रचंड जहाल अशी घोषणाबाजी केली.

दरम्यान, मंगळवारी दुपारी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किरण पातूरकर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी शिवसेना, युवा सेेनेचे पदाधिकारी पराग गुडधे, सुनील राऊत, श्याम धाने, वैभव मोहोकार, सचिन ठाकरे व १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास पराग गुडधे व अन्य शिवसैनिकांनी भाजपच्या राजापेठ स्थित कार्यालयात जाळपोळीचा प्रयत्न केला. त्यांच्याजवळ पेट्रोलदेखील होते, असे पातूरकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

गुन्हा दाखल होईपर्यंत भाजपजन ठाण्यात

माजी मंत्री अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, महापौर चेतन गावंडे, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, पक्षनेता तुषार भारतीय यांनी दुपारी १२ च्या सुमारास राजापेठ पोलीस ठाणे गाठले. जाळपोळ करणाऱ्या शिवसैनिकांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी बुलंद केली. यावेळी पक्षाचे नगरसेवक, नगरसेविकादेखील उपस्थित होत्या. ठाणेदार मनीष ठाकरे भाजपजनांना सामोरे गेले.

एसीपींनी सांभाळला मोर्चा

प्रत्युत्तर म्हणून भाजपजन शिवसेनेच्या राजापेठ कार्यालयावर हल्लाबोल करून पुतळादहन करू शकतात, या शक्यतेपोटी राजकमल चौकात कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज, तर राजापेठ स्थानक चौकात एसीपी भारत गायकवाड यांनी मोर्चा सांभाळला. या चौकात उपायुक्त शशिकांत सातव यांनीदेखील धावती भेट दिली. चौकात दंगा नियंत्रक वाहन तैनात होते.

Web Title: BJP burnt CM's statue in front of Rajapeth police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.