भाजपतर्फे दुबार पेरणीसाठी आर्थिक मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:47+5:302021-07-10T04:10:47+5:30

तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी ४ हजार रुपये दराने ३० किलो सोयाबीनचे बॅग ...

BJP demands financial help for double sowing | भाजपतर्फे दुबार पेरणीसाठी आर्थिक मदतीची मागणी

भाजपतर्फे दुबार पेरणीसाठी आर्थिक मदतीची मागणी

Next

तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी ४ हजार रुपये दराने ३० किलो सोयाबीनचे बॅग घेऊन पेरणी केली. १५०० रुपये नांगरणी, २५०० रुपये रोटावेवेटर, १ हजार रुपये खत, १ हजार रुपये पेरणी असे एकूण १० हजार रुपये खर्च केलेला आहे. इतका खर्च केल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेले पीक नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी १० हजार रुपये मदत देण्यात यावे व बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत विनंती करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे सुभाष गुप्ता, सुधाकर पकडे, रामकृष्ण सोनोने, किसन आघाडीचे अध्यक्ष सुहास सालफडे, महासचिव सुनील लखपती, सचिव मनीष पाण्डेय, तुळशीराम बेठेकर, शहर अध्यक्ष सुशील गुप्ता, प्रवीण सदाफळे, हरिराम सावलकर, रमेश जावरकर, गोपाल तोटे, केशव सावलकर, प्रेमलाल भिलावेकर, जयराम सावलकर उपस्थित होते.

Web Title: BJP demands financial help for double sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.