भाजपा नेते माजी मंत्री अनिल बोंडे यांना तीन महिने कारावासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:47 AM2022-04-06T07:47:30+5:302022-04-06T07:48:15+5:30
Anil Bonde: नायब तहसीलदारांना मारहाण, शिवीगाळप्रकरणी माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना स्थानिक न्यायालयाने तीन महिने साधा कारावास, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
अमरावती : नायब तहसीलदारांना मारहाण, शिवीगाळप्रकरणी माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना स्थानिक न्यायालयाने तीन महिने साधा कारावास, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
वरूड तहसील कार्यालयात ३० सप्टेंबर २०१६ रोजी ही घटना घडली होती. नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना बोंडे यांनी कार्यालयात बोलावून घेतले. संजय गांधी निराधार योजनेचे २४० अर्ज त्रुटीमध्ये का काढले, अशी विचारणा करून माझ्या कार्यकर्त्यांचे काम केले नाही, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली हाेती.
जाब विचारण्यास गेले की लाव ३५३, असा चुकीचा पायंडा आहे. मंगळवारी लागलीच जामीन मिळाला. निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करू. - डॉ. अनिल बोंडे