भाजप ही भारतीय जनतेचा पैसा लुटणारी पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:10+5:302021-07-17T04:11:10+5:30

फोटो - सायकल रॅलीत वीरेंद्र जगतापसह काँग्रेसचे पदाधिकारी वीरेंद्र जगताप, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात धामणगावात काँग्रेसची अनोखी सायकल ...

The BJP is a party that robs the Indian people of their money | भाजप ही भारतीय जनतेचा पैसा लुटणारी पार्टी

भाजप ही भारतीय जनतेचा पैसा लुटणारी पार्टी

Next

फोटो - सायकल रॅलीत वीरेंद्र जगतापसह काँग्रेसचे पदाधिकारी

वीरेंद्र जगताप, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात धामणगावात काँग्रेसची अनोखी सायकल रॅली

धामणगाव रेल्वे : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस व खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात धामणगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटी, युवक कॉंग्रेसच्यावतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शुक्रवारी शास्त्री चौक ते तहसील कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.

केंद्रातील मोदी सरकार रोजच पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या किमती वाढवत आहे. आणि गॅस सिलिंडरची सबसिडी बंद केली आहे. रोजच वाढणारी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ, खाद्यतेल झाले महाग झाले. दररोज वाढत चाललेल्या ‌महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे. जगणे कठीण झाले आहे. मनमोहनसिंग यांच्या काळात कच्च्या तेलाचे दर १०८ ते १५० रुपये डॉलर प्रतिबॅरल असतानाही ७२ रुपये पेट्रोलचे दर होते. मोदी सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर ४० ते ७० डॉलर प्रतिबॅरल एवढे कमी झाले असतानाही सध्या १०८.९१ रुपये पेट्रोल, डिझेल ९७.०६ रुपये गॅस सिलिंडरचे ८५५ रुपये दर आहेत. संपूर्ण जगभरात इंधनावर सर्वांत जास्त कर मोदी सरकार वसूल करीत आहे. भारतीय जनता पार्टी ही आजची भारतीय जनतेचा पैसा गोळा करणारी पार्टी झाली असल्याचे वीरेंद्र जगताप म्हणाले. मोदी सरकारने इंधनाच्या, गॅस सिलिंडरचे दर ताबडतोब कमी करावे, अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

शहरातील शास्त्री चौक, टिळक चौक, मेन लाईन, गांधी चौक, भगतसिंग चौक, कॉटन मार्केट चौक असा सायकल रॅलीने मार्गक्रमण करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, तालुकाध्यक्ष रवीश बिरे, शहराध्यक्ष नितीन कनोजिया, मोहन सिंघवी, सुरेश निमकर, नितीन दगडकर, शुभम भोंगे, विजय बोरकर, श्रीकांत गावंडे, धनंजय शेलोकर, सचिन रामगावकर, मुकेश राठी, अविनाश इंगळे, पंकज वानखडे, राजेश पुरोहित, आशिष मुंदडा, गणेश धवणे, सुनील भोगे, दिलीप मुंदडा, बालू ठाकरे, विनोद तुपट, प्रवीण चिंचे, विलास डुकरे, अनिसखाँ पठाण, मनोज सोळंके, धीरज गावंडे, रूपेश गुल्हाने, राहुल रॉय, ओमप्रकाश बुधलानी, विनोद तायडे, नरेश गावंडे, शुभम तरोने, विपिन ठाकरे, मंगेश बोबडे, विठ्ठल सपाटे, संजय तायडे, परीक्षित जगताप, आशिष भोगे, संतोष परसापुरे, उमेश झिबल, ऋषीकेश जगताप, वैभव पावडे, अक्षय गावंडे, आशिष शिंदे, शुभम चौबे, आलिम पठाण, विनीत टाले, समीर पाटील यांची उपस्थिती होती.

Web Title: The BJP is a party that robs the Indian people of their money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.