पालिकेची हद्दवाढ भाजपाची उपलब्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:31+5:302021-07-01T04:11:31+5:30

काँग्रेसने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये :- दर्यापूर भाजपाचा आरोप काँग्रेसने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, पत्रपरिषदेतून इशारा दर्यापूर ...

BJP's achievement in extending the boundaries of the municipality | पालिकेची हद्दवाढ भाजपाची उपलब्धी

पालिकेची हद्दवाढ भाजपाची उपलब्धी

Next

काँग्रेसने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये :- दर्यापूर भाजपाचा आरोप

काँग्रेसने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, पत्रपरिषदेतून इशारा

दर्यापूर : नगरपालिकेच्या हद्दवाढीसंबंधी प्रस्ताव तथा पूर्तता भाजपच्या कार्यकाळात. ती भाजपाची उपलब्धी आहे. केवळ काँग्रेस कार्यकाळात मंजुरी मिळाली. तत्कालीन आमदार रमेश बुंदिले, आ. प्रकाश भारसाकळे व नगराध्यक्ष नलिनी भारसाकडे यांचे प्रयत्न त्यासाठी लाभले. काँग्रेसने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा सज्जड दम दर्यापूर भाजपाने पत्रपरिषदेत बुधवारी दिला.

दर्यापूर नगरपालिकेची हद्दवाढ आमदार बळवंत वानखडे यांनी करून आणली, असा प्रचार काँग्रेसकडून सातत्याने होत आहे. साईनगर, गायवाडी यांच्यासह अनेक भाग दर्यापूर पालिका क्षेत्राला जोडला जाणार आहे. यासंबंधी लगतच्या ग्रामपंचायतींचे ठराव, हद्दवाढीचे इस्टिमेट तथा नगरपालिकेचा प्रस्ताव आदींसह कागदपत्रांची पूर्तता करीत शासनदरबारी मांडण्यात आली होती. याचा पाठपुरावासुद्धा तत्कालीन आमदारांनी शासनाकडे केला होता. यासंबंधी पुरावेसुद्धा पत्रपरिषदेत मांडण्यात आले.

पत्रपरिषदेला भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल गोळे, जिजाई प्रतिष्ठानचे विनय गावंडे, नगरसेविका हर्षवती निर्मळ तसेच रीतेश लांडे (रा. साईनगर) उपस्थित होते.

--------------

सदर प्रस्ताव शासनदरबारी धूळखात पडला होता. पालकमंत्री यशोमती ठाकूर व ना. एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात मंजुरी दिली. नागरिकांची मागणी असल्याने त्याचा आनंद सर्वांना व्हायला हवा.

- बळवंत वानखडे, आमदार, दर्यापूर

===Photopath===

300621\20210630_170940.jpg

===Caption===

पालिकेची हद्दवाढ भाजपाची उपलब्धि

काँग्रेसने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये :- दर्यापूर भाजपाचा आरोप

Web Title: BJP's achievement in extending the boundaries of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.