भाजपचा आधारवड हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:37 AM2018-08-24T01:37:25+5:302018-08-24T01:37:50+5:30
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधना२मुळे भाजपचा आधारवड हिरावला असून, त्यांची तेज:पुंज प्रतिमा कार्यकर्त्यांच्या मनात ठसठशीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधना२मुळे भाजपचा आधारवड हिरावला असून, त्यांची तेज:पुंज प्रतिमा कार्यकर्त्यांच्या मनात ठसठशीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केले.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश अमरावतीत गुरुवारी सकाळी बडनेरा येथे अस्थिकलश शालिमार एक्सप्रेसने आणलेला अस्थिकलश सर्वप्रथम अमरावती शहर भाजप मुख्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला. येथे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आ. अनिल बोंडे, आ. सुनील देशमुख, माजी आमदार अरुण अडसड, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, प्रदेश सचिव निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष जयंत डेहणकर, शहर सचिव तुषार भारतीय, महापौर संजय नरवणे, सुरेखा लुंगारे, किरण पातूरकर, विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, डॉ.राजीव जामठे, नगरसेवक अनिल आसलकर यांच्यासह सर्व नगरसेवक आदींनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यानंतर अस्थिकलश गुरुकुंज मोझरीकडे रवाना झाला. दरम्यान, अंबा मंडळातर्फे स्थानिक सराफातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ शुक्रवारी दुपारी ४ अस्थिकलश ठेवण्यात येईल. सायंकाळी ६.३० वाजता संत ज्ञानेश्वर सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा होईल. २५ आॅगस्ट रोजी दुपारी ४. ३० ते ५.१५ दरम्यान मोर्शी व सायंकाळी ६.३० वाजता वरूड येथे अस्थिकलश आणला जाईल.
तिवसा/मोझरी : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी दुपारी तिवसा तालुक्यात आला होता. यावेळी अस्थिकलशाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली. गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीसमोर अस्थिकलश ठेवण्यात आला होता. त्यांनतर तिवसा पेट्रोल पंप चौकात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पालकमंत्री प्रवीण पोटे, अरुण अडसड, निवेदिता चौधरी, दिनेश सूर्यवंशी, तुषार भारतीय, जनार्दनपंत बोथे, राजाराम बोथे, रविराज देशमुख, संजय चांडक, अमित बाभूळकर, अजय आमले, गुलाब खवसे, अरविंद राठोड, अमोल बांबलसह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.