चार विषय समिती सभापती, उपसभापतिपदी भाजपची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:00 PM2019-06-21T22:00:35+5:302019-06-21T22:01:23+5:30

महानगरपालिकेच्या चार विषय समिती सभापती व उपसभापतिपदांची निवडणूक शुक्रवारी पार पडली. चारही समित्यांचे पदाधिकारी म्हणून भाजपचे उमेदवार अविरोध निवडून आले. या समित्यांवर ३६ सदस्यांपैकी २० सदस्य हे भाजप नगरसेवक आहेत.

BJP's stand of four Subject Committee Chairmen, Sub-Chapters | चार विषय समिती सभापती, उपसभापतिपदी भाजपची बाजी

चार विषय समिती सभापती, उपसभापतिपदी भाजपची बाजी

Next
ठळक मुद्देमहापालिका : गोपाल धर्माळे, अजय सारसकर, वंदना हरणे, इंदू सावरकर अविरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महानगरपालिकेच्या चार विषय समिती सभापती व उपसभापतिपदांची निवडणूक शुक्रवारी पार पडली. चारही समित्यांचे पदाधिकारी म्हणून भाजपचे उमेदवार अविरोध निवडून आले. या समित्यांवर ३६ सदस्यांपैकी २० सदस्य हे भाजप नगरसेवक आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त मंगेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता वाजता महापालिकेच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात सभापती व उपसभापतींच्या निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी प्रत्येक पदासाठी एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे विधी समिती सभापतिपदी इंदू सावरकर व उपसभापतिपदी आशिष अतकरे, शहर सुधार समिती सभापतिपदी अजय सारसकर व उपसभापतिपदी संजय वानरे, माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती सभापतिपदी गोपाल धर्माळे व उपसभापतिपदी पंचफुला चव्हाण, तर महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी वंदना हरणे व उपसभापतिपदी सुनंदा खरड यांची अविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचे महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, सभागृहनेता सुनिल काळे, भाजप शहर अध्यक्ष जयंत डेहनकर, किरण पातूरकर, झोन सभापती प्रमिला जाधव, सोनाली नाईक, गंगा अंभोरे, नगरसेवक मिलिंद चिमोटे, तुषार भारतीय, विवेक कलोती, प्रणीत सोनी, चंद्रकांत बोमरे, शिरीष रासने, अजय गोंडाणे, बलदेव बजाज, विजय वानखडे, धीरज हिवसे, राजेश साहू, ललित झंझाळ, लविना हर्षे, सुरेखा लुंगारे, रेखा भुतडा, संगीता बुरंगे, पद्मजा कौंडण्य, वंदना मडघे, अर्चना धामणे, सुचिता बिरे, निता राऊत, स्वाती जावरे, जयश्री कुºहेकर, अनिता राज, स्वाती कुळकर्णी, सोनाली करेसिया, शोभा शिंदे, रीता पडोळे, रीता मोकलकर, शिल्पा पाचघरे, सतीश करेसिया, सुनील जावरे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
 

Web Title: BJP's stand of four Subject Committee Chairmen, Sub-Chapters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा