कर्जमाफीसाठी भाजपाचे थाळी वाजवा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:01:21+5:30

कोरोनाच्या संकट काळात सरकारने जाहीर केल्यानुसार अनेक शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी ऐन खरीप हंगामात नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे पेरणीकरिता पैशांची तडजोड कुठून करायची, या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. त्यांना संकटातून सावरण्यासाठी शासनाने मागील कर्जमाफी करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांचा रोजगार गेला आहे.

BJP's thali wajwa agitation for debt waiver | कर्जमाफीसाठी भाजपाचे थाळी वाजवा आंदोलन

कर्जमाफीसाठी भाजपाचे थाळी वाजवा आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाकचेरी, मध्यवर्ती बँकेवर धडक : सरकार विरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे अद्यापही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे नवीन कर्ज मिळत नसल्याची बाब लक्षात घेता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करून नवीन कर्ज द्यावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपक्षातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर थाळी वाजवा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कोरोनाच्या संकट काळात सरकारने जाहीर केल्यानुसार अनेक शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी ऐन खरीप हंगामात नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे पेरणीकरिता पैशांची तडजोड कुठून करायची, या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. त्यांना संकटातून सावरण्यासाठी शासनाने मागील कर्जमाफी करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांचा रोजगार गेला आहे. अशांना छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी बँका कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यांना सरकारने कर्जपुरवठा करण्याचे आदेश बँकांना द्यावे. आर्थिक विंवचनेत समस्त जनता त्रस्त आहे. अशावेळी महावितरणने भरसाठ विजेची दरवाढ करून एकाचवेळी तीन महिन्यांची देयके दिली आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी वीज देयके माफ करावे आदी मागण्या भाजपाने आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे केल्या आहेत. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा बँकेचे व्यवस्थापन आदींना देण्यात आले आहेत. आंदोलनात भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, आमदार प्रताप अडसड, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, माजी आमदार रमेश बुंदिले, तुषार भारतीय, जयंत डेहनकर, शिवराय कुलकर्णी, चेतन गावंडे, दिनेश सूर्यवंशी, कुसूम शाहू, प्रणय कुलकर्णी, कमलकांत लाडोळे, सपना गुडधे, प्रवीण तायडे, शरद मोहोड, सारंग खोडस्कर, संजय घुलक्षे, संध्या टिकले, सुरेखा लुंगारे, रविराज देशमुख आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: BJP's thali wajwa agitation for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.