चांदूर रेल्वेत पाळला काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:13 AM2021-05-27T04:13:18+5:302021-05-27T04:13:18+5:30

मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याचाही केला निषेध काळे झेंडे दाखवित केली नारेबाजी सूचना- चांदूर बाजारची बातमी यात बॉक्स ...

Black day observed on Chandur Railway | चांदूर रेल्वेत पाळला काळा दिवस

चांदूर रेल्वेत पाळला काळा दिवस

Next

मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याचाही केला निषेध

काळे झेंडे दाखवित केली नारेबाजी

सूचना- चांदूर बाजारची बातमी यात बॉक्स घ्यावी

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

फोटो - पी २६ चांदूर रेल्वे

शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण, काळे झेंडे दाखवित नारेबाजी

चांदूर रेल्वे : केंद्र शासनाने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सहा महिन्यांपासून शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. अजूनही सरकारने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. यामुळे २६ मे रोजी चांदूर रेल्वे शहरातील गाडगेबाबा मार्केटमध्ये अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे काळा दिवस पाळून सरकारचा निषेध करण्यात आला.

शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या कालावधीत कृषी कायद्यांना विरोध करीत शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यातील चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. शेतकरी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम असून, सरकार ही मागणी स्वीकारण्यास तयार नाही. सरकारने आता आंदोलकांशी चर्चा करणेच बंद केले आहे. शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चांदूर रेल्वे शहरात अनोखा काळा दिवस पाळण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याचाही निषेध यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारविरोधात नारेबाजीसुद्धा करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे विनोद जोशी, नितीन गवळी, देविदास राऊत, विजय रोडगे, रामदास कारमोरे, विनोद लहाने, चरण जोल्हे, कृष्णकुमार पाटील, प्रभाकर कडू, प्रसेनजित तेलंग, हरिसिंह चव्हाण, पंकज घोडे, भीमराव बेराड, निळकंठ दिघडे, चौधरी आदींची उपस्थिती होती.

===Photopath===

260521\img-20210526-wa0015.jpg

===Caption===

photo

Web Title: Black day observed on Chandur Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.