कंत्राटदार जुमानत नसल्याने काळ्या यादीत टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:13+5:302021-01-14T04:12:13+5:30

अमरावती : महानगराला १ मार्चपासून रोज पाणीपुरवठा करावा त्‍यासाठी संपूर्ण नियोजन करा. काम पूर्ण करीत नसल्‍यामुळे सदर कंत्राटदाराला ...

Blacklist because the contractor is not a juvenile | कंत्राटदार जुमानत नसल्याने काळ्या यादीत टाका

कंत्राटदार जुमानत नसल्याने काळ्या यादीत टाका

Next

अमरावती : महानगराला १ मार्चपासून रोज पाणीपुरवठा करावा त्‍यासाठी संपूर्ण नियोजन करा. काम पूर्ण करीत नसल्‍यामुळे सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्‍याची कारवाई करण्‍याच्‍या सूचना महापौरांनी दिल्‍या. येणाऱ्या अडचणी त्‍वरित सोडवून कामाची गती आहे त्‍यापेक्षा अधिक करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे यावेळी त्‍यांनी सांगितले.

महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साही, आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह पदाधिकारी व मजीप्राचे अधिकाऱ्यांनी अप्‍पर वर्धा धरण व जलशुद्धीकरण केंद्राची मंगळवारी पाहणी केली. कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी योजनेची माहिती देत येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. पाहणीदरम्‍यान स्‍थायी समिती सभापती राधा कुरील, नगरसेवक प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, शहर अभियंता रवींद्र पवार, महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, कार्यकारी अभियंता सुहास चव्‍हाण, मजीप्राचे उपविभागीय अभियंता निवृत्ती रकनाडे, वसंतराव मस्‍करे, सहायक अभियंता मनोज वाकेकर, उपविभागीय अभियंता यांत्रिकी पल्‍लवी पडोळे, उपअभियंता श्‍यामकांत टोपरे, सहायक अभियंता सुधीर गोटे उपस्थित होते.

बॉक्स

मजीप्रा योजनेची स्थिती

स्‍थापत्‍य कामाच्‍या स्वीकृत निविदेची किंमत ८३,२५,९९,६२४ रुपये आहे. कंत्राटदाराचे नाव मे. पी. एल. आडके, कंत्राटदार नाशिक येथील असून, १० ऑक्टोबर २०१६ ला कार्यारंभ आदेश देण्यात आला. काम पूर्ण करण्‍याचा कालावधी २४ महिने म्हणजे ९ ऑक्टोबर २०१८ पर्यंत होता. परंतु सदर कंत्राटदाराने अजूनही पूर्ण काम केले नसल्‍यामुळे महापौरांनी यावेळी नाराजी व्‍यक्‍त केली. सदर योजनेची भौतिक प्रगती ८३ टक्‍के इतकी झाली असून, या योजनेवर आतापर्यंत ८९.६६ कोटी निधी उपलब्‍ध असून, अमृत योजनेवर ७७.८८ कोटी खर्च झालेला आहे.

Web Title: Blacklist because the contractor is not a juvenile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.