विद्यार्थिनीला 'ब्लॅकमेल' करणारा प्राध्यापक अटकेत

By admin | Published: September 9, 2015 12:08 AM2015-09-09T00:08:05+5:302015-09-09T00:08:05+5:30

विनयभंग करून 'ब्लॅकमेल' करणाऱ्या प्राध्यापकाच्या अत्याचाराला कंटाळून विद्यार्थिनीने औषधीच्या भरमसाठ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

A blackmailing professor detained the student | विद्यार्थिनीला 'ब्लॅकमेल' करणारा प्राध्यापक अटकेत

विद्यार्थिनीला 'ब्लॅकमेल' करणारा प्राध्यापक अटकेत

Next

अमरावती : विनयभंग करून 'ब्लॅकमेल' करणाऱ्या प्राध्यापकाच्या अत्याचाराला कंटाळून विद्यार्थिनीने औषधीच्या भरमसाठ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल करून विदर्भ महाविद्यालयातील कंत्राटी प्राध्यापक प्रवीण उगले (२६, रा. बोर्डी, अकोट) याला गाडगेनगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
परजिल्ह्यातील रहिवासी असलेली एक १८ वर्षीय मुलगी २०१३ मध्ये अमरावतीत शिक्षणासाठी आली. ती शहरातील एका नामांकित महाविद्यालयात मराठी वाङ्मयाचे शिक्षण घेत आहे. मात्र, तेथेच तिच्या ओळखीतील कंत्राटी प्राध्यापक आरोपी प्रवीण उगले भेटला. प्रवीणने डाव साधून तिचा विनयभंग केला आणि तिचे अश्लील छायाचित्र काढून 'ब्लॅकमेल' करणे सुरु केले. याबाबत पीडित विद्यार्थिनीने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या हेल्पलाईनकडेसुध्दा धाव घेतली. मात्र, त्यानंतरही तिला त्रास देऊन प्रवीण पैशांची मागणी करू लागला. प्रवीणने अनेकदा पीडित विद्यार्थिनीचे एटीएम कार्ड हिसकून तिच्या खात्यातील पैसे काढून घेतले. हा अत्याचार वाढत असल्यामुळे पीडिताने सोमवारी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून प्रवीण उगलेविरूध्द तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या २९४, २५४, ३८४ अन्वये गुन्हा नोंदविला. यासंबंधाने विदर्भ महाविद्यालयाच्या संचालकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.
सदर तक्रार आमच्याकडे आली होती. प्राध्यापकाला बोलवून आम्ही समज दिली होती. चूक झाल्याचे त्याने लिहून दिले. तथापि, मुलीचे समाधान झाले नाही. पोलीस तक्रार करण्याचा सल्ला आम्ही दिला.
- संजय तिरथकर,
हेल्पलाईन.
पीडित मुलीला उपचाराकरिता नागपूरला हलविले
प्रवीण हा महाविद्यालयातील अन्य मुलींना लग्नाचे आमिष देऊन फसवणूक करीत असल्याची माहिती पीडित विद्यार्थिनीने दिलीे. अब्रूच्या भीतीपोटी पीडिता आतापर्यंत प्रवीणविरुद्ध खुलून संघर्ष करीत नव्हती. तथापि, अत्याचार वाढतच गेल्याने अखेर तिने सोमवारी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. अत्याचाराच्या असह््य विचारांमुळे मानसिक तणावात असल्याची आणि औषधीचा अतिरिक्त डोज घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पीडिताने पोलिसांना दिली. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिला पुढील उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले.

Web Title: A blackmailing professor detained the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.