अभियंत्यावर चिखलफेकप्रकरणी काळ्या फिती लावून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 01:32 AM2019-07-06T01:32:45+5:302019-07-06T01:33:11+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे चिखलफेक केल्याचा जिल्ह्यात शुक्रवारी काळ्या फिती लावून शासकीय अभियंत्यांनी निषेध नोंदविला. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदनात कठोर कारवार्इंची मागणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे चिखलफेक केल्याचा जिल्ह्यात शुक्रवारी काळ्या फिती लावून शासकीय अभियंत्यांनी निषेध नोंदविला. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदनात कठोर कारवार्इंची मागणी करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयातून सकाळी ११ वाजता सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढली होती. याप्रसंगी अरुंधती शर्मा, मिलिंद पाटणकर, अरविंद गावंडे, राजेंद्र वाघ, अनिल भटकर, घनश्याम पवार, नितीन भटकर, सुहास चव्हाण, सचिव जयंत काळमेघ, सचिन चौधरी, अश्विन चव्हाण, अरविंद व्यास, प्रदीप खवले, विभावरी वैद्य, अरविंद व्यास, उल्हास क्षीरसागर, श्री.गो. राठी, सुरेंद्र कोपुलवार, आनंद जवंजाळ, प्रशांत गावंडे, विजय वाठ , एन. आर. देशमुख, एस.एच. काझी, प्रकाश देशमुख, राजेंद्र भागवतकर, संदीप देशमुख, श्रीराम खवले, नांदगावकर, किशोर रघुवंशी तसेच विविध विभागांतील वरिष्ठ अभियंत्यांची उपस्थिती होती. राजपत्रित अभियंता संघटना, कनिष्ठ अभियंता संघटना, सरळ सेवा वर्ग-२ अभियांत्रिकी अधिकारी संघटना, अमरावती महापालिका अभियंता असोसिएशन, वरिष्ठ अभियंता संघटना, जीवन प्राधिकरण अभियंता संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी संघटना पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.