मोर्शी तालुक्यात स्फोट; एकाच दिवशी ६५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:52+5:302021-04-18T04:11:52+5:30
पान २ चे लिड मोर्शी : तालुक्यात कोरोना संसर्गाचा मोठा उद्रेक झाला असून, शुक्रवारी पुन्हा तालुक्यात ६५ ...
पान २ चे लिड
मोर्शी : तालुक्यात कोरोना संसर्गाचा मोठा उद्रेक झाला असून, शुक्रवारी पुन्हा तालुक्यात ६५ नवे कोरोनाग्रस्त आढळले. पैकी मोर्शी शहरात जवळपास २० रुग्णांची नोंद आहे. सिंभोरा रोडवरील एका ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात पंजाबराव कॉलनी येथील ६० वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय महिला, अजमिरे ले-आऊट येथील २७ वर्षीय पुरुष, ज्ञानदीप कॉलनी येथील ६२ वर्षीय पुरुष, पुनर्वसन कॉलनी येथील ३० वर्षीय पुरुष, रुक्मिणीनगर येथील ५३ वर्षीय महिला, प्रभात चौक मोर्शी येथील ३० वर्षीय पुरुष, सुलतानपुरा येथील ६० वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील ५७ वर्षीय पुरुष, पोलीस स्टेशन येथील ३० वर्षीय महिला, अप्पर वर्धा कॉलनी येथील २६ वर्षीय पुरुष, जयस्तंभ चौक येथील ६० वर्षीय पुरुष, विवेकानंद कॉलनी येथील २० वर्षीय पुरुष, दीप कॉलनी येथील ६० वर्षीय पुरुष, रामनगर येथील ६१ वर्षे पुरुष, रामकृष्ण कॉलनी येथील ४४ वर्षीय पुरुष, माळीपुरा येथील ४० वर्षीय महिला, ७५ वर्षीय पुरुष तसेच तालुक्यातील खोपडा येथील सहा पुरुष, दोन महिला, हिवरखेड येथील ६० वर्षीय पुरुष, पाळा येथील ७५ वर्षीय महिला, २३ वर्षीय पुरुष, मायवाडी येथील ३० वर्षीय पुरुष, तरोडा येथील तीन पुरुष, एक महिला, दापोरी येथील ६६ वर्षीय पुरुष, चिखलसावंगी येथील १७ वर्षीय पुरुष, पार्डी येथील २३ वर्षीय पुरुष, निंबी येथील २२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळले. कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत चालले असून, नागरिक दहशतीखाली जीवन जगत आहेत. शासन व प्रशासनाने गंभीरतेने दखल घेऊन त्वरित उपाययोजना अमलात आणाव्या, अशी मागणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांनी केली आहे.
---------
चाकर्दा येथील परिस्थिती आवाक्याबाहेर
आठवड्यात पाच मृत्यू , प्रत्येक घरात सर्दी न् खोकला ताप
धारणी : कोरोना विषाणू हळूहळू गाव-खेड्यापर्यंत प्रवेशल्याने तालुक्यात परिस्थिती गंभीर झाली आहे. आरोग्य प्रशासन हतबल झाले असून, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे थेट मृत्यूचा धोका असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
धारणी शहरातील जवळपास सर्व दवाखाने हाऊसफुल असून, दुसरीकडे भूमका आणि परिहार यांच्या आहारी जाऊनदेखील अनेकांनी आपले जीव गमावले आहे. तालुका मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील चाकर्दा या गावातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, घरोघरी सर्दी खोकला व तापाचे रुग्ण असल्यामुळे आणि अवघ्या एका आठवड्यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर अनेक गंभीर अवस्थेतील रुग्ण अमरावती येथे उपचार घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तलाई कॅम्प येथील दोघांचा मृत्यू
धारणी शहराला लागून असलेल्या तलाई कॅम्प येथील ६५ वर्षीय पुरुषाचा अमरावती येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच भागातील एका २५ वर्षीय महिलेचासुद्धा उपजिल्हा रुग्णालय येथे मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. मृत्यू कशामुळे झाला, याचा अनेकांविषयी उलगडा होऊ शकला नसल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. धारणी येथे पॉझिटिव्ह रुग्णासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली आहे .
------------------
दोन बातम्या समोरासमोर लावून पान २ ची लिड करणे