ब्लास्ट, नवा उच्चांक ४९८, सहा मृत्यूही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:23 AM2021-02-18T04:23:24+5:302021-02-18T04:23:24+5:30

अमरावती : कोरोना संसर्गाचा रोज नवा धमाका जिल्ह्यात सुरू आहे. कोरोनाकाळातील ११ महिन्यांतील सर्वाधिक ४९८ पॉझिटिव्हचा हादरा ...

Blast, new high of 498, six deaths | ब्लास्ट, नवा उच्चांक ४९८, सहा मृत्यूही

ब्लास्ट, नवा उच्चांक ४९८, सहा मृत्यूही

googlenewsNext

अमरावती : कोरोना संसर्गाचा रोज नवा धमाका जिल्ह्यात सुरू आहे. कोरोनाकाळातील ११ महिन्यांतील सर्वाधिक ४९८ पॉझिटिव्हचा हादरा बुधवारी बसल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २६,७२६ झाली आहे. २४ तासांत उपचारादरम्यान सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ४४८ झाली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या १७ दिवसांत ४,७४७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर सलग तीन दिवसांत, ४४९, ४८५ व ४९८ असे एकूण १४३० संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा धमाका झालेला आहे.

‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत शासनाने सर्व क्षेत्रांत मोकळीक दिल्यानंतर आता कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढीस लागला आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सध्या वाट लागली असल्याने जिल्हा प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने केंद्र शासनाचे तीन सदस्यीय पथकाने जिल्ह्यास भेट देऊन सूचना केल्या होत्या तसेच मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना जिल्हास्थिती अवगत केली होती. बुधवारी पुन्हा राज्याच्या आरोग्य विभागाने माजी आरोग्य संचालक तथा जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीचे डॉ. साळुंके व अन्य एक सल्लागार यांनी जिल्ह्यास भेट दिली. त्यांनी प्रथम सुपर स्पेशालिटीमध्ये बैठक घेतली व नंतर एक्झॉन हॉस्पिटल व आयसोलेशन दवाखान्याला भेट दिली. सायंकाळी जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसोबत संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

- तर हॉटेल, बारला २५ हजारांचा दंड, १० दिवस सील

हॉटेल, बार, रेस्टॉरेंटमध्ये क्षमतेच्या ५० टक्क्यांवर व्यक्ती आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन नसल्यास २५ हजारांचा दंड आकारून पुढील १० दिवसांकरिता ते प्रतिष्ठान सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले.

-----------

५० पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास मंगल कार्यालयास ५० हजारांचा दंड

जिल्ह्यातील मंगल कार्यालये, लॉन, हॉल , सभागृहांमध्ये आयोजित लग्नात ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास संबंधित मंगल कार्यालय चालक, मालक, व्यवस्थापकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन ५० हजारांचा दंड आकारणी करण्यात येईल. पुढील १० दिवसांसाठी मंगल कार्यालय सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी बजावले.

बॉक्स

जिल्हाधिका०यांचे आदेश

* जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी प्रवाशांनी चेह०याला मास्क व फिजिकल डिस्टनचे पालन बंधनकारक, अन्यथा ५ हजारांचा दंड.

* जिल्ह्यातील दुकाने, आस्थापना व इतर सेवा देणाºयांनी, मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य, अन्यथा १० हजारांचा दंड

--------------

असे आहे पॉझिटिव्ह

१० फेब्रुवारी : ३५९

११ फेब्रुवारी : ३१५

१२ फेब्रुवारी : ३६९

१३ फेब्रुवारी : ३७६

१४ फेब्रुवारी : ३९९

१५ फेब्रुवारी : ४४९

१६ फेब्रुवारी : ४८५

१७ फेब्रुवारी : ४९८

--------------------------------------------

मृत्यूचा स्फोट, सहा बळी

जिल्ह्याच्या चिंतेत भर, संक्रमितांची मृत्युसंख्या ४४८

अमरावती : जिल्ह्यातील ११ महिन्यांच्या कोरोनाकाळात सर्वाधिक मृत्यूचे तांडव फेब्रुवारी महिन्यात होत आहे. १७ दिवसांत ३० रुग्ण कोरोनाचे बळी ठरले. बुधवारी सहा रुग्णांचा बळी गेल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ४४८ झाली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, येथील जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल ३९ वर्षीय पुरुष, याच रुग्णालयात दाखल भातकुली येथील ८० वर्षीय वृद्ध, याच रुग्णालयातील नवसारी येथील ८० वर्षीय वृद्ध व गणपतीनगरातील ६५ वर्षीय व्यक्ती व मसानगंज येथील ७० वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. याशिवाय महावीर रुग्णालयात किशोरनगरातील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

बॉक्स

असे आहेत कोरोना बळी

१० फेब्रुवारी : ०१

११ फेब्रुवारी : ०१

१२ फेब्रुवारी : ०३

१३ फेब्रुवारी : ०१

१४ फेब्रुवारी : ०३

१५ फेब्रुवारी : ०४

१६ फेब्रुवारी : ०३

१७ फेब्रुवारी : ०६

-------------------------------------

Web Title: Blast, new high of 498, six deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.