तुझी माझी जोडी जमली गं.. कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळवला प्रेमावर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 02:17 PM2021-12-24T14:17:49+5:302021-12-24T15:08:32+5:30

अमरावतीतील एका सुंदर जोडप्याची ही कहाणी जरा हटकेच आहे. ते दोघे एकमेकांना बघू शकत नाही मात्र, मन की आँखों का प्यार आणि जिव्हाळ्यानी त्या दोघांना एक केलं. त्यांच्या लग्नाचा विषय हा सध्या जिल्ह्यात चर्चेचा ठरतोय. 

a blind couples unique journey from love to get marriage through sangli to amravati | तुझी माझी जोडी जमली गं.. कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळवला प्रेमावर विजय

तुझी माझी जोडी जमली गं.. कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळवला प्रेमावर विजय

googlenewsNext
ठळक मुद्देदिव्यांग जोडप्याचा प्रेम ते विवाहपर्यंतचा अनोखा प्रवास

अमरावती : 'प्रेम' या शब्दाची जादू आणि त्याची दुनिया वेगळीच असते. दोन जीवांची आत्मियता तळमळ शब्दात व्यक्त करता येत नाही. अमरावतीतील एका सुंदर जोडप्याची ही कहाणी अशीच काहीशी स्पेशल आहे. ते दोघे एकमेकांना बघू शकत नाही मात्र, मन की आँखों का प्यार आणि जिव्हाळ्यानी त्या दोघांना एक केलं. त्यांच्या लग्नाचा विषय हा सध्या जिल्ह्यात चर्चेचा ठरतोय. 

तुम्ही प्रेमाचे अनेक किस्से ऐकले असतील, पण राहुल आणि आरतीच्या प्रेमाचा किस्सा जरा हटकेच आहे. राहुल बावणे हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील माहुला जहांगीर या गावचा तर, आरती कांबळे ही सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोघेही दृष्टीहीन आहेत, त्यावर मात करत दोघेही जिद्दीने आयुष्यातील आव्हानांना समोर जात आहेत. आरती ही उत्तम गायिका आहे तर, राहुल  हा केंद्रीय लोकसेवा आयोगच्या परीक्षेची तयारी करतोय.

तर झालं अस की २०१६ साली गोंदिया येथे दृष्टिहिन संघटनेच्यावतीने विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये आरती व राहूल यांनीही भाग घेतला.  दरम्यान, मराठी वाचन स्पर्धेत आरतीने राहुलला हरवलं. त्यानंतर, याच कार्यक्रमात तिनं एक गाणही गायलं. तिच्या गाण्यातील स्वर आणि सुरात राहुल गुंतला. त्यानंतर, ओळखी झाली एकमेकांचे फोन नंबर घेतले. त्यातून हळूहळू मैत्री फुलली व याचे प्रेमात रुपांतर झाले. 

पण म्हणतात ना, प्रेम करणं सोपं असत पण जिंकणं तितकच कठीण. या दोघांच्या नात्याबद्दल घरच्यांना कळलं, पण काही कारणास्तव आरतीच्या कुटुंबियांनी या नात्याला नकार दिला. इतकच काय तर तिच घराबाहेर येणजाणंही बंद केलं. तिने घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुटुंबिय आपल्या निर्णयावर कायम असल्यामुळे ती खचली मात्र, राहुलने तिला पाठबळ देत विवाहाची तयारी दर्शवली. राहुलच्या पाठिंब्यामुळं आरतीला बळ मिळालं व तिनं त्याला भेटण्यासाठी अमरावतीला येण्याचा निर्णय घेतला. 

पण म्हणतात ना, प्यार की डगर आसान नहीं होती प्यारे, तसच काहीस इथेही झालं. राज्यात एसटी कामगारांनी संप पुकारल्याने बसेस बंद होत्या. सर्वत्र प्रवासी त्रस्त जिकडेतिकडे गर्दीचगर्दी खासगी वाहने खचाखच भरून जात होती. अशात प्रवास करताना आरतीला अनेक अडचणी आल्या. पण, म्हणतात ना.. जहा चाह वहा राह तसेच झाले. आरतीने सांगलीहुन मोठ्या हिमतीने अमरावती गाठले, दोघांची भेट झाली. राहुलने घरच्यांना कळवलं, त्याच्या कुटुंबियांचा पाठिंबा मिळाला व मंगळवारी या दोघांचही शुभ मंगल सावधान.. अगदी उत्साहात पार पडलं. 

तर, या दोघांनी त्यांची प्यार की मंजिल शेवटी गाठलीच आणि हा हटके विवाहसोहळा आनंदात संपन्न झाला. सध्या सर्वत्र त्यांच्या या विवाहसोहळ्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: a blind couples unique journey from love to get marriage through sangli to amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.