‘ब्लाइंड क्वार्नर’ची दिल्लीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:30+5:302021-01-22T04:12:30+5:30
फोटो पी २१ चांदूररेल्वे रस्ता फोल्डर चांदूररेल्वे : वर्षभरापूर्वी डांबरीकरण केलेला अमरावती-चांदूररेल्वे महामार्ग दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी अपघातप्रवण ठरत आहे. वर्षभरात ...
फोटो पी २१ चांदूररेल्वे रस्ता फोल्डर
चांदूररेल्वे : वर्षभरापूर्वी डांबरीकरण केलेला अमरावती-चांदूररेल्वे महामार्ग दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी अपघातप्रवण ठरत आहे. वर्षभरात या मार्गावर ११ जणांचा बळी गेला. यासंदर्भात वृत्त प्रकाशित होताच मंगळवारी थेट दिल्ली येथील अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली. तथा सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाला या मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
नवीन वर्षात आतापर्यंत या मार्गावर तीन अपघात झाले. एकाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. गत वर्षभरात या मार्गावर एकूण १९ अपघात झाले असून त्यापैकी ११ जणांचा बळी गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभराचा कालावधी लोटूनही या रस्त्याच्या पाटचऱ्या भरल्या नाहीत. दरम्यान, मंगळवारी कंत्राटदाराचे प्रतिनिधी म्हणून अंकित गोयल व प्रोजेक्ट मॅनेजर राणा यांनी रस्त्याची पाहणी करून अपघात रोखण्यासंदर्भात निर्देश दिले.
या मार्गावर ज्या ठिकाणाहून वन्यप्राणी रस्ता ओलांडतात, त्या जागेवर साईन बोर्ड व स्पीड ब्रेकर उभारावेत. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत कापण्यास काही हरकत नाही.
- आशिष कोकाटे,
वनाधिकारी, चांदूररेल्वे
कोट
रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपनीचे सेफ्टी कन्सल्टंसी आले. त्यांनी पाहणी केली. लवकरच उपायोजना केली जाईल.
- पी. एन. कोवळे,
उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग