नेत्रदानदिनाच्या पूर्वसंध्येला एक मिनिट बांधली डोळ्यावर पट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:09+5:302021-06-10T04:10:09+5:30

अमरावती : सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या तसेच शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या माधुरी ढवळे यांच्या मार्गर्शनात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी ...

Blindfolded for one minute on the eve of Eye Donation Day | नेत्रदानदिनाच्या पूर्वसंध्येला एक मिनिट बांधली डोळ्यावर पट्टी

नेत्रदानदिनाच्या पूर्वसंध्येला एक मिनिट बांधली डोळ्यावर पट्टी

Next

अमरावती : सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या तसेच शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या माधुरी ढवळे यांच्या मार्गर्शनात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी होऊ घातलेल्या नेत्रदान दिनाच्या पूर्वसंध्येला डोळ्यावर एक मिनिट काळी पट्टी बांधून नेत्रहिनांच्या वेदना अनुभवल्या व इतरांनाही त्याची जाणीव करून दिली. हा कार्यक्रम बुधवारी पंचवटी चौकात एका हॉलमध्ये पार पडला.

१० जून हा ‘जागतिक नेत्रदान दिन’ म्हणून पाळला जातो. त्याअनुषंगाने हरिना फाऊंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन या अभियानात सहभाग घेण्याचा निश्चिय केला. यावेळी माधुरी ढवळे व इतर कर्मचारी उपस्थिती होते. हरिना फाऊंडेशनची स्थापना १० वर्षांपूर्वी झाली. आतापर्यंत २९०० जणांनी नेत्रदान केले असून, ३ लाख लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे. २१० जणांवर नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे. या समितीचे कार्य अविरत सुरू असून, या माध्यमातून देशासह विदेशातसुद्धा अमरावतीचे नावलौकिक होत असल्याची माहिती जागतिक नेत्रदान दिनानिमित्त चंद्रकांत पोपट यांनी दिली.

Web Title: Blindfolded for one minute on the eve of Eye Donation Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.