आनंदावर विरजण; पाऊणतास परतवाडा-अकोला महामार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:06 PM2018-02-25T23:06:56+5:302018-02-25T23:06:56+5:30

परतवाडा येथून जुनी कार खरेदी केली. आनंदाच्या भरात पेढे घेऊन आपल्या पांढरी खानमपूर या गावी रविवारी सायंकाळी ४ वाजता निघालेल्या शेतकऱ्याच्या कारने अचानक वडगाव फत्तेपूरनजीक पेट घेतला आणि क्षणात सर्व जळून आनंदाची राखरांगोळी झाली.

Bliss; Returning to Paratwada-Akola highway jam | आनंदावर विरजण; पाऊणतास परतवाडा-अकोला महामार्ग ठप्प

आनंदावर विरजण; पाऊणतास परतवाडा-अकोला महामार्ग ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देदोघे बचावले : वडगावनजीक धावत्या कारने घेतला पेट

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : परतवाडा येथून जुनी कार खरेदी केली. आनंदाच्या भरात पेढे घेऊन आपल्या पांढरी खानमपूर या गावी रविवारी सायंकाळी ४ वाजता निघालेल्या शेतकऱ्याच्या कारने अचानक वडगाव फत्तेपूरनजीक पेट घेतला आणि क्षणात सर्व जळून आनंदाची राखरांगोळी झाली. या घटनेने परतवाडा-अकोला महामार्गावरील वाहतूक पाऊणतास ठप्प पडली होती.
श्रीकृष्ण भाऊलाल ठाकरे (रा. पांढरी खानमपूर) असे कार विकत घेणाऱ्यां शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी त्यांनी जुनी एमएच ० पी.ए. १३३९ क्रमांकाची मारोती ८०० कार साठ हजार रुपयांमध्ये परतवाडा येथून विकत घेतली होती. कारसह एका साथीदाराला घेत ते गावाकडे निघाले आणि ४ वाजता धावत्या कारने अचानक पेट घेतला. कारमधून धूर निघताच दोघांनी थांबवून रस्त्याने ये-जा करणाºया वाहनांकडे कार विझविण्यासाठी पाण्याची मागणी केली. मात्र, वाºयाच्या वेगाने कारने पेट घेतला. त्यातून स्फोट होत असल्याने परिसरात काही वेळासाठी दशहत पसरली होती. सदर प्रकार रस्त्याने जाणारे भाजपचे अचलपूर तालुका अध्यक्ष रितेश नवले, पं.स. सदस्य विशाल काकड यांनी तत्काळ अग्निशमन आणि पोलिसांना माहिती देत वाहतूक दूर अंतरापर्यंत थांबविले.
वाहनांच्या दुतर्फा रांगा
परतवाडा-अकोला महामार्गावर वडगाव नजिक कारने पेट घेताच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परतवाडा येथून अग्निशमन दल येताच कार विझविल्यावर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. सदर रस्त्याचे चौपदरीकरण सुरू असल्याने एका बाजूने मोठ्या प्रमाणात खोदण्यात आले आहे.
मिठाईचा डबा अन् हतबल शेतकरी
पै पै जमा करून शेतकरी श्रीकृष्ण ठाकरे यांनी जुनी कार खरेदी केली होती. ती घेऊन जाताना परिवारासह मित्रमंडळीसाठी त्यांनी आनंदाचा क्षण म्हणून मिठाईचा डबा परतवाड्यातून विकत घेतला. मात्र, कारने अचानक पेट घेतला आणि क्षणात आनंदावर विरजण पडले. पेटलेली कार डोळ्याने बघत ते ढसाढसा रडत विझविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना उपस्थित गर्दीतील नागरिकांनी धरून ठेवले.

Web Title: Bliss; Returning to Paratwada-Akola highway jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.