लॉकडाऊनमध्ये स्थिलता मिळताच नाकेबंदी पॉईंट केले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:11 AM2021-05-24T04:11:48+5:302021-05-24T04:11:48+5:30
अमरावती : सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता शिथिलता देण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यामुळे आता ...
अमरावती : सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता शिथिलता देण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यामुळे आता पोलिसांचाही ताण थोडा कमी झाला आहे. शहर हद्दीतील काही नाकाबंदी पॉईंट कमी करण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य चौकातील फिक्स पॉईंटवर कसून चौकशी करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजतानंतर उन्हाचा तडखा वाढत असल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. कडक लॉकडाऊमध्ये शहरात ४५ ठिकाणी फिक्स पॉईंट, तर शहराच्या सीमारेषांच्या बाहेर सात ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले होते. तेव्हा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता थोडी शिथिलता मिळल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. मात्र, सकाळी ११ वाजतानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर बंदी असून त्यांच्यावर कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदविला जात आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक गुन्हे गाडगेनगर ठाण्यात नोंदविले गेले. आता फिक्स पाईंट व नाकाबंदी पाॅईंट निम्मे करण्यात आले आहे. मात्र सांयकाळी पंचवटी चौक, शेगाव नाका, कठोरा नाका, इर्विन चौकातील वाहतूक शाखा, जयस्तंभ चौक, वेलकम पॉईंट, राजकमल चौक, इतवारा चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची विचारपूस करून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाई केली जात आहे. शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा, असे आदेश यापूर्वीच पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी संबंधित ठाणेदारांना दिले आहे. पोलिसांची रात्रीची पेट्रोलिंगसुद्धा वाढली आहे.