शहर हद्दीतील ४८ पॉर्इंटवर नाकाबंदी तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:01:22+5:30
पोलिसांच्यावतीने काही दिवस नाकाबंदीवर शिथिलता देण्यात आली होती तसेच सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याकरीता सुट देण्यात आली आहे. या संधीचा फायदा घेत नागरिक अकारण रस्त्यावर फिरू लागले होते. दुपारी २ नंतरही नागरिक रस्त्यावर असतात. यामुळे आठवड्याभरापासून शेकडो चालकांवर कारवाई करून वाहने जप्त करणाऱ्या पोलिसांनी शुक्रवारपासून नाकाबंदी तीव्र केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील हाथीपुऱ्यात एका जणाच्या कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्या अनुषंगाने दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शुक्रवारपासून ४८ ठिकाणी नाकाबंदी तीव्र करण्यात आली आहे. प्रत्येक पॉइंटवर संचारबंदीत ये-जा करणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे.
पोलिसांच्यावतीने काही दिवस नाकाबंदीवर शिथिलता देण्यात आली होती तसेच सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याकरीता सुट देण्यात आली आहे. या संधीचा फायदा घेत नागरिक अकारण रस्त्यावर फिरू लागले होते. दुपारी २ नंतरही नागरिक रस्त्यावर असतात. यामुळे आठवड्याभरापासून शेकडो चालकांवर कारवाई करून वाहने जप्त करणाऱ्या पोलिसांनी शुक्रवारपासून नाकाबंदी तीव्र केली. पंचवटी चौक, राजकमल चौक, इर्विन चौक, गोपालनगर, चित्रा चौक, हाथीपुरा, वलगाव पोलीस ठाणे, भातकुली मुख्य चौक आदी ४८ ठिकाणी नाकाबंदी पॉइंट लावण्यात आले आहेत. तेथे प्रत्येक नागरिकाची चौकशी केली जात आहे. केवळ अकारण बाहेर पडणारेच नव्हे, तर मास्क न वापरणाºयांवरसुद्धा कारवाई करण्यात येत आहे.
जीवनावश्यक वस्तूंची खरेदी वगळता नागरिकांनी संचारबंदीत बाहेर पडू नये. नाकाबंदी पॉइंटसह शहरात १५० अधिकारी व ७०० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. त्या ठिकाणी चौकशी व कारवाई केली जात आहे. गुरुवारी मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या २६ नागरिकांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
- यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त, अमरावती