जळगाव आर्वीत ३१ युवकांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:12 AM2021-04-18T04:12:03+5:302021-04-18T04:12:03+5:30
धामणगाव तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक गावे हॉटस्पॉट बनत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्याअनुषंगाने येथील प्राथमिक आरोग्य ...
धामणगाव तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक गावे हॉटस्पॉट बनत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्याअनुषंगाने येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रक्तदान शिबिर पार पडले. उद्घाटन राजीव भोगे, माजी उपसरपंच संदीप भोगे, ज्येष्ठ नागरिक शरद भोगे, मोरेश्वर भोगे यांनी केले. रक्तसंकलन पथकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, डॉ. धीरज देशमुख व मनीष पिंजरकर, प्रशांत जोशी, अविनाश उकांडे,आगरकर, मनोज सरदार यांनी काम पाहिले. गणेश मंडळाचे प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत खोंडे, अतुल भोगे यांच्या आयोजनात सचिन ठाकरे, भूषण भोगे, मनोज काकडे, सुनील पाटील, अतुल गावंडे, सूरज वानखडे, आशा सेविका सविता क्षीरसागर, प्रभा भोसले, अंगणवाडी सेविका नीलिमा घंटेवार, अलका भोगे, विजया टोणपे, ज्योती तिमाने, ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर बुरघाटे, गजानन क्षीरसागर सहभागी झाले.