पशुसंवर्धनाच्या ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:13 AM2021-05-21T04:13:26+5:302021-05-21T04:13:26+5:30
पशुसंवर्धन दिन; कोरोना काळात समाजपयोगी उपक्रम अमरावती : २० मे हा पशुसंवर्धन विभागाचा स्थापना दिवस. यानिमित्त जिल्हा ...
पशुसंवर्धन दिन; कोरोना काळात समाजपयोगी उपक्रम
अमरावती : २० मे हा पशुसंवर्धन विभागाचा स्थापना दिवस. यानिमित्त जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शुक्रवारी शासकीय कुक्कट पालन प्रकल्प कार्यालयात पशुसंवर्धन विभागाच्या ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून पशुसंवर्धन दिन साजरा केला.
दरवर्षी पशुसंवर्धन दिना निमित्त पशुनधासाठी विशेष शिबीरे घेतली जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे या शिबिरासह रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन झेडपीचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापती विठ्ठल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समिती सदस्य शरद मोहोड, सुखदेव पवार, पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय राहाटे, पशुधन विकास अधिकारी राजेंद्र देशमुख आदींच्या उपस्थित करण्यात आले. रक्तदान शिबिरात जिल्ह्यातील ४० पशुधन अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. रक्तदान करणाऱ्यांमध्ये पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक, पट्टीबंधक व परिचर आदींनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय राहाटे यांच्या मार्गदर्शनात पशुधन विकास अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले होते.