नांदगावात काँग्रेसच्या शिबिरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:12 AM2021-04-17T04:12:16+5:302021-04-17T04:12:16+5:30
नांदगाव खंडेश्वर : शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने नांदगाव खंडेश्वर येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ...
नांदगाव खंडेश्वर : शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने नांदगाव खंडेश्वर येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. माजी आमदार वीरेंद्र जगताप हे प्रामुख्याने उपस्थित होते.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक सवाई, शहराध्यक्ष अमोल धवसे, माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, सचिन रिठे, विनोद जगताप, राजेश जाधव, गजानन मारोटकर, गजानन डांगे, श्रीराम दुधे, देवेंद्र सव्वालाखे, योगेश चवाळे, सुयश कटके, नितीन मोरे, मंगेश जोगे, संजय कुंभलकर, दिलीप तामगाडगे, भीमराव रंगारी, म. इद्रीस, शेख हारून, रशीद, मुमताज, अतुल दुधे, हकीम, अक्षय गुल्हाने, उमेश सोनोने, सतीश पोफळे, प्रदीप ब्राह्मणवाडे, मनोहर बगडे, मोरेश्वर दिवटे, अमोल वानखडे व काँग्रेसची बरीच मंडळी याप्रसंगी उपस्थित होती.
या शिबिरात डॉक्टर पंजाबराव देशमुख रक्तपेढीचे डॉ. ऋतुजा वायल, भागवत गुडधे, राहुल गवई, दिनेश चरपे, साहेबराव अलमावादे यांनी रक्त संकलनाचे कामकाज सांभाळले.
2 Attachments