रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान !
By Admin | Published: April 11, 2016 12:12 AM2016-04-11T00:12:51+5:302016-04-11T00:12:51+5:30
: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण, हे दान केल्याने एखाद्याचे प्राण वाचून त्याला जीवदान मिळू शकते, असे विचार बीसीयूडीचे संचालक
कुलगुरू सपकाळ : केमिकल टेक्नॉलॉजी विभागामध्ये रक्तदान शिबिर
अमरावती : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण, हे दान केल्याने एखाद्याचे प्राण वाचून त्याला जीवदान मिळू शकते, असे विचार बीसीयूडीचे संचालक तथा केमिकल टेक्नॉलॉजी विभागप्रमुख. कुलगुरू आर.एस. सपकाळ यांनी व्यक्त केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा केमिकल टेक्नॉलॉजी विभाग राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्यावतीने सोमवारी आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक तथा विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे, जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तसंकलन अधिकारी उकंडे, कंठे, रासेयो युनिटचे प्रशांत शिंगवेकर उपस्थित होते. मागील सात वर्षांपासून केमिकल टेक्नॉलॉजी विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
सुरूवातीला पुष्पगुच्छ देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले. शिबिरात ७५ हून अधिक विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. संचालन रासेयो युनिटचे समन्वयक प्रशांत शिंगवेकर यांनी केले.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कुंभारे व रक्त संकलन चमू, केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील पवार, हेन्ड, वानखडे, मावळे, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर, विभागातील कर्मचारी, विद्यार्थी रासेयो स्वंयसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)