बाबूजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी रक्तदान शिबिर
By Admin | Published: July 1, 2017 12:14 AM2017-07-01T00:14:33+5:302017-07-01T00:14:33+5:30
लोकमत वृत्तपत्र समूह व संत गाडगेबाबा रक्तपेढी अँड कम्पोनंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने "लोकमत"चे संस्थापकीय संपादक ....
"लोकमत"चा सामाजिक उपक्रम : सहभागी होण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकमत वृत्तपत्र समूह व संत गाडगेबाबा रक्तपेढी अँड कम्पोनंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने "लोकमत"चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रविवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत "लोकमत" कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, युवती, नागरिक, सेवाभावी संस्था, शासकीय, खासगी संस्था, समाजसेवक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ता, युवा नेक्स्ट व सखी मंच सदस्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक रक्तदात्याला रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणपत्र देण्यात येईल. या रक्तदान अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत समूहातर्फे करण्यात आले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे ९९२२४२७७९४, ९८५०३०४०८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदाता संघाचे आयोजन
वरुड : स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघ आणि लोकमत परिवार वरूडच्यावतीने २ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.रक्तदात्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन रक्तदाता संघ व ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.