आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:08 AM2021-05-03T04:08:28+5:302021-05-03T04:08:28+5:30
आता १८ ते ४४ वयोगटातील युवकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याने काही कालावधीसाठी युवकांना रक्तदान करता येणार नसल्याने ...
आता १८ ते ४४ वयोगटातील युवकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याने काही कालावधीसाठी युवकांना रक्तदान करता येणार नसल्याने या रक्तदान शिबिरात युवकांचा मोठा सहभाग दिसून आला. शहरात रक्ताचा पुरेसा पुरवठा राहावा यासाठी देखील हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी एक लाखाचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीला प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष प्रभाकरराव वैद्य, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, माजी खासदार अनंत गुढे, माजी महापौर विलास इंगोले, नगरसेवक विवेक कलोती, प्रशांत देशपांडे, दिलीप कलोती, दिलीप दाभाडे, राजाभाऊ मोरे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर हिवसे, संजय तिरथकर, भूषण पुसतकर, वैभव दलाल, राजाभाऊ माजलगावकर, प्रवीण चौधरी, प्रकाश संगेकर, निलेश सराफ, मयूर जलतारे आदींचा सहभाग होता.