गोडे महाविद्यालयात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:49+5:302021-04-29T04:09:49+5:30
--------------- दर्यापूरच्या इसमाला १६ हजारांनी गंडा दर्यापूर : बँक वा क्रेडिट कार्डचे डिटेल न मागताही खात्यातून १६ हजार ७०० ...
---------------
दर्यापूरच्या इसमाला १६ हजारांनी गंडा
दर्यापूर : बँक वा क्रेडिट कार्डचे डिटेल न मागताही खात्यातून १६ हजार ७०० रुपये लंपास करण्यात आल्याची घटना शहरातील वसंत नगर येथे घडली. दर्यापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रांनुसार, राजेंद्र अशोक बागळे (५९) यांना ५ एप्रिल रोजी ७०४७९९१०१४ या मोबाइल क्रमांकावरून कॉल करण्यात आला. अज्ञात व्यक्तीने राजेंद्र बागळे यांना क्रेडिट कार्ड व्हेरिफिकेशन करायचे असल्याचे सांगितले. इतर कोणतीही माहिती न विचारता केवळ ओटीपी विचारला. त्यांनी तो सांगताच ६७०० रुपये खात्यातून परस्पर वळते झाले. त्यानंतर पुन्हा १५ एप्रिल रोजी त्याच क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. राजेंद्र बागळे यांनी तो कट केला; पण यावेळीही १० हजार रुपये खात्यातून गेले. त्यांंनी २७ एप्रिल रोजी दर्यापूर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी भादंविचे कलम ४२० सह माहिती-तंत्रज्ञान अधिनियम सुधारणा २००८, कलम ६६ सी, डी अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला प्रारंभ केला आहे.
--------------------
हनुमान जयंती साधेपणाने साजरी
बडनेरा : शहरातील बारीपुरा, चावडी चौक, कंपासपुरा, सजनाजी मंदिर, नव्या वस्तीतील आठवडी बाजार परिसरातील, दुर्गापूर, पांढरीचा मारुती या सर्वच मंदिरांवर कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून भक्तांनी मारुतीरायाचे दर्शन घेतले. हनुमान जयंतीला ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद होत असतो. दोन वर्षांपासून हे सर्व ठप्प आहे.