‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त महापालिकेत रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:12 AM2021-09-25T04:12:47+5:302021-09-25T04:12:47+5:30

अमरावती : स्वातंत्र्याची ७५ वर्षे या उपक्रमातंर्गत महापालिकेत शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह ...

Blood donation to the Municipal Corporation on the occasion of 'Swatantryacha Amritmahotsav' | ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त महापालिकेत रक्तदान

‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त महापालिकेत रक्तदान

Next

अमरावती : स्वातंत्र्याची ७५ वर्षे या उपक्रमातंर्गत महापालिकेत शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमात ५० पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.

कोरोना संसर्ग काळात गरजूंना तातडीने रक्त उपलब्ध व्हावे, याकरिता रक्तदान शिबिर घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या होत्या. महापालिकेचा आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त आयोजनातून हे शिबिर घेण्यात आले. रक्तदान हे सामाजिक कर्तव्य आहे. नि:स्वार्थ भावनेने केले पाहिजे, असे आवाहन आयुक्तांनी केले. या वेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समितीचे सभापती सचिन रासने, सभागृह नेता तुषार भारतीय, गटनेता चेतन पवार, सुनंदा खरड, संध्या टिकले, अजय सारस्कर, राम चव्हाण, महेश देशमुख, श्रीकांत चव्हान, नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, धनजंय शिंदे, अब्दुल राजिक आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation to the Municipal Corporation on the occasion of 'Swatantryacha Amritmahotsav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.