बचू कडू यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद, जिल्हा बँकेच्या १०३ कर्मचाऱ्यांचे रक्तदान
By जितेंद्र दखने | Published: June 22, 2024 06:54 PM2024-06-22T18:54:57+5:302024-06-22T18:55:24+5:30
रक्ताचा तुटवडा असल्याने प्रहार संघटनेच्या वतीने राज्यभर २६ जुन पर्यत रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे.
अमरावती : जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पाहता बँकेच्या कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन अध्यक्ष आ. बच्चु कडू यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवार २२ जून रोजी बँकेत राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०३ कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आदर्श निर्माण केला आहे.
रक्ताचा तुटवडा असल्याने प्रहार संघटनेच्या वतीने राज्यभर २६ जुन पर्यत रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. अशातच बँकेत देखील कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभविण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष कडू यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बँकेत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात १०३ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
रक्तदान करणाऱ्या बॅकेच्या कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष आ,बच्चू कडू व बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी कौतुक केले, रक्तदान प्रक्रियेकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी व संत गाडगेबाबा रक्तपेढी, बडनेरा यांचे सहकार्य लाभले.यावेळी बँकचे अधिकारी संजय इंगळे, नितीन दामले, किशोर काकडे, संजय जवंजाळ, गगन बढिये, विकास उईके, मनोज शेरेकर, रावसाहेब पुनसे व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.