मनोरुग्णांच्या जखमांवर प्रेमाची फुंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:32+5:302021-08-18T04:17:32+5:30
फोटो - मनोरुग्ण १, २, ३परतवाडा : अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये भिकारी व मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. समाजात ...
फोटो - मनोरुग्ण १, २, ३परतवाडा : अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये भिकारी व मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. समाजात त्यांना स्थान नसले तरी शहरातील एका संघटनेने पुढाकार घेत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यांची अंघोळ घातली. दाढी-नखे, केस कापून नवीन कपडे दिले.
शहरातील आझाद हिंद सेना या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबविला. जितेंद्र रोडे, मोनू सुळे, राम पाटील, अनिल माथने, किशोर वडतकर, तुषार उघडे, प्रमोद गुल्हाने यांच्यासह आझाद हिंद सेनेचे ऋषीकेश बारब्दे, उद्देश टेहरे,विपुल बाटे, शुभम खेरडे, अर्जुन उपाध्याय, स्वप्निल खांडेकर, अभिषेक सातपुते, सौरभ बांबलकर, यश चडोकार, आशु मोहोड, प्रज्वल हाडोळे, सार्थक काठोळे, राधेश्याम घोम, प्रियांशु कौतिककर, प्रथमेश जडे, टिकू घवे, यश सराटकर, श्रीमल दवंडे, प्रखर खारोने, ऋषी चौधरी, मुन्ना चंदनानी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
----------------बारा मनोरुग्णांची अंघोळ, जेवण आणि परिधान
शहरातील १० ते १२ मनोरुग्णांना एकत्र करून अंघोळ, मिष्टान्नाचे जेवण, दाढी-कटिंग, नखे कापून नवे कपडे देण्याचा आगळा-वेगळा उपक्रम युवकांनी केला. या त्यांच्या कार्याबद्दल कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडली आहे.