शिवजन्मोत्सवात निळा-भगवा एकत्र
By admin | Published: February 20, 2016 12:40 AM2016-02-20T00:40:27+5:302016-02-20T00:40:27+5:30
शिवजयंतीच्या पर्वावर शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात शिवजन्मोत्सवाची धूम राहिली. विद्यार्थी स्वाभिमानने शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ््याला दुग्धाभिषेक करण्यात आला.
शिवजयंतीचा जल्लोष : रॅलीने शहर दुमदुमले; शिव पुतळ्यावर दुग्धाभिषेक
अमरावती : शिवजयंतीच्या पर्वावर शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात शिवजन्मोत्सवाची धूम राहिली. विद्यार्थी स्वाभिमानने शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ््याला दुग्धाभिषेक करण्यात आला. विद्यार्थी स्वाभिमान संघटना, राजे नवयुवक मंडळ, भीमक्रांती मंडळासह अन्य सामाजिक संघटनेच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली.
शिवजयंती निमित्त शिवटेकडीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजकीय, सामाजिक संघटनाऱ्यांसह हजारो शिवप्रेमी शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक झालेत.
जि.प. कर्मचाऱ्यांकडून अन्नदान
अमरावती : शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने शिवटेकडी दुमदुमली. जिल्ह्यात सर्वदूर शिवजन्मोत्सवाची धूम राहिली. महापालिकेच्या वतीनेसुध्दा शिवटेकडीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि लिपीकवर्गीय संघटनेच्या वतीने स्थानिक सायन्स्कोर मैदानालगत अन्नदान करण्यात आले.
अमरावती जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर घाटे, जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने, श्रीकांत मेश्राम, अर्चना लाहुडकर, शिल्पा काळमेघ, समीर चौधरी, प्रशांत धर्माळे, नीलेश तालन, धनराज कल्ले, राजू गाडे, ईश्वर राठोड, नितीन माहुरे आदी जि.प. कर्मचाऱ्यांनी अन्नदानासाठी परिश्रम घेतले. शहरातील एक हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. (प्रतिनिधी)