जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळ कायम

By admin | Published: December 29, 2015 02:16 AM2015-12-29T02:16:04+5:302015-12-29T02:16:04+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुढील आदेशापर्यंत मावळते संचालक मंडळच कायम राहिल, असा महत्त्वपूर्ण आदेश

The Board of Directors of the District Co-operative Bank | जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळ कायम

जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळ कायम

Next

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुढील आदेशापर्यंत मावळते संचालक मंडळच कायम राहिल, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी काढला. त्यामुळे कार्यकाळ संपुष्टात येऊनही बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील २५ सदस्यीय संचालक मंडळच पुढील आदेशापर्यंत बँकेचे कामकाज करणार आहे.
विशेष म्हणजे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत रविवारी (२७ डिसेंबर) संपुष्टात आल्यानंतर विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी प्राधिकृत अधिकारी नेमून आजच बँकेचा पदभार स्वीकारला. त्या पार्श्वभूमिवर आजच न्यायालयीन निर्णय आल्याने बँक व्यवस्थापन पुन्हा पेचात अडकले आहे. न्यायालयीन निर्णयाबाबत आपण ऐकले असून आॅर्डर मिळालेली नाही. आॅर्डरची प्रत मिळाल्यानंतर न्यायालयात बाजू मांडू, असे विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम १६६/४ या तरतुदीनुसार निवडणूक होईपर्यंत जुनेच संचालक मंडळ कायम ठेवण्यात यावे, अशी विनंती याचिका बँकेचे विद्यमान संचालक प्रवीण काशीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे आठवड्यापूर्वी दाखल केली होती. त्यावर सोमवारी न्या. झेड. ए. हक यांच्या अवकाशकालीन न्यायालयाने ती विनंती मान्य करीत पुढील आदेशापर्यंत ‘प्रेझेंट बोर्ड आॅफ डायरेक्टर शाल कंटिन्यू अनटील फर्दर आॅर्डर’ असा निर्णय सुनावला आहे. याशिवाय प्रशासन बँकेची निवडणूक घेण्यासाठी पावले उचलू शकते. तथापि सहकार प्रशासनाला प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळ नेमणुकीसाठी कुठलेही पाऊल उचलता येणार नाही, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ रविवारी संपुष्टात आला. त्या पार्श्वभूमिवर आज प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार आम्ही सकाळीच चार्ज घेतला. न्यायालयीन निर्णयाची प्रत अद्याप अप्राप्त आहे.
- संगीता र. डोंगरे
प्राधिकृत अधिकारी
तथा विभागीय सहनिबंधक.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यावर विभागीय सहनिबंधकांनी कुठलीही नोटीस न देता एकांगी पदभार घेतला, हे गैर आहे. तथापि न्यायालयीन निर्णयाने विद्यमान संचालक मंडळच कायम आहे.
- नितीन हिवसे
संचालक, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक.

Web Title: The Board of Directors of the District Co-operative Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.