रानडुकरांनी उडविली दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 05:00 AM2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:23+5:30

सातेगाव येथील रहिवासी अशोक बोरोडे यांनी रामापूर शिवारातील शेतात दीड एकर क्षेत्रात पºहाटी लावली. योग्य निगा राखल्याने झाडेही साडेपाच-सहा फुटांपर्यंत वाढली आहेत. प्रत्येक झाडाला ५० ते ७० बोंडे लदबदली असल्याने किमान १५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती. तीन एकरात अवघे साडेतीन क्विंटल सोयाबीन त्यांना घरी नेता आले. हे नुकसान कपाशीतून भरून निघेल, अशी अपेक्षा असतानाच रानडुकरांनी पिकांमध्ये शिरून उच्छाद मांडला आहे.

The boars blew the grain | रानडुकरांनी उडविली दाणादाण

रानडुकरांनी उडविली दाणादाण

googlenewsNext
ठळक मुद्देकपाशी उखडली। सोयाबीनच्या नापिकीनंतर शेतकऱ्यांना आणखी एक फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : सोयाबीनच्या अत्यल्प उत्पादनाचे शल्य मनात ठेवून शेतकरी ज्या पिकाकडे अपेक्षेने पाहत होता, त्या कपाशीवर घाला घालत उरल्यासुरल्या अपेक्षाही रानडुकरांनी घालविल्या आहेत. रानडुकरे सौर कुंपणाला जुमानत नाहीत. ठार करण्याची परवानगी नाही. यामुळे फूल-बोंडांनी लदबदलेली कपाशी आडवी होताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे इलाज नाही. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथील शेतकऱ्यांची ही समस्या आजूबाजूच्या परिसरातही डोके वर काढत आहे.
सातेगाव येथील रहिवासी अशोक बोरोडे यांनी रामापूर शिवारातील शेतात दीड एकर क्षेत्रात पऱ्हाटी लावली. योग्य निगा राखल्याने झाडेही साडेपाच-सहा फुटांपर्यंत वाढली आहेत. प्रत्येक झाडाला ५० ते ७० बोंडे लदबदली असल्याने किमान १५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती. तीन एकरात अवघे साडेतीन क्विंटल सोयाबीन त्यांना घरी नेता आले. हे नुकसान कपाशीतून भरून निघेल, अशी अपेक्षा असतानाच रानडुकरांनी पिकांमध्ये शिरून उच्छाद मांडला आहे. जमिनीपासून वीत-दीड वीत ठेवून पुढील अख्खे झाड झोपविण्याचे कसब असलेल्या रानडुकरांनी उभे पीक आडवे केले. कपाशीच्या शेतात सीतादहीच झाली नाही. एकही वेचा घरी आला नाही. लागवडीचा खर्च निघाला नसल्याने भरपाईची मागणी अशोक बोरोडे, नरेंद्र शेळके, पुरुषोत्तम बोरोडे व परिसरातील शेतकºयांनी केली. त्यांना रानडुकरांमुळे नापिकीचा सामना करावा लागत आहे.

वनमंत्र्यांकडे मागणार दाद
रानडुकरांनी पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकारी, तहसीलदार व वनविभागाला करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याशिवाय राज्याच्या वनमंत्र्यांकडे नुकसानभरपाईची फिर्याद देणार असल्याचेही शेतकरी म्हणाले.

दिवसाही भीती
शेताचा कोपरानकोपरा माहिती असणाºया शेतकऱ्यांना आता दिवसाची रानडुकरांमुळे जिवाची भीती आहे. वगारीच्या आकाराएवढी ३५ ते ४० डुकरे रामापूर शिवारात निर्धोक फिरत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

उपाययोजना फोल
अशोक बोरोडेसह काही शेतकऱ्यांनी रानडुकरांना अटकाव करण्यासाठी शेताला सौर कुंपण घातले आहे. त्यालाही न जुमानता डुकरे शेतात शिरून बोंड्या फस्त करीत आहेत.

Web Title: The boars blew the grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.