४५ तासानंतर मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 09:27 PM2018-11-10T21:27:26+5:302018-11-10T21:27:41+5:30
दिवळीच्या पाडव्याला कोंडेश्वर परिसरातील भिवापूर तलावात बुडालेल्या इसमाचा मृतदेह शनिवारी जिल्हा शोध, बचाव पथकाने बडनेरा पोलिसांच्या मदतीने १० नोव्हेंबर रोजी काढला. तब्बल ४५ तास ही शोधमोहीम राबविली गेली.
बडनेरा : दिवळीच्या पाडव्याला कोंडेश्वर परिसरातील भिवापूर तलावात बुडालेल्या इसमाचा मृतदेह शनिवारी जिल्हा शोध, बचाव पथकाने बडनेरा पोलिसांच्या मदतीने १० नोव्हेंबर रोजी काढला. तब्बल ४५ तास ही शोधमोहीम राबविली गेली.
नीलेश गुलाबराव भांबूरकर (४५, रा. अंजनगाव बारी) हे भिवापूर तलावात गाय धुण्यासाठी गेला होते. दरम्यान गाईचा दोर नीलेशच्या पायात अडकल्याने ती बिथरली व पाण्यात शिरली. यामुळे नीलेश बुडाल्याची माहिती बडनेरा पोलिसांना मिळाली. त्यांनी जिल्हा शोध, बचाव पथकाला पाचारण केले. तब्बल ४५ तास मृतदेहाचा शोध घेतल्यानंतर शनिवारी मृतदेह हाती लागला. भिवापूर तलावाचे खोलीकरण झाल्याने मध्यभागी खोली ६० फुटांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शोधकार्यात वेळ लागला. मोहिमेत बडनेराचे पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी व पथक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, बचाव पथकाचे गणेश बोरोकार, विजय धुर्वे, गुलाब पाटणकर, हिरालाल पटेल, किशोर धुर्वे, गौरव पुसतकर, गौरव जगताप, उदय मोरे, हेमंत सरकटे, सारंग उईके, वहीदभाई यांनी सहभाग घेतला.